मंगळवार, एप्रिल 14, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : गवताचं पातं Is Back, ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवरच गाणं म्हणत नाचू लागले ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे कलाकार, समीर चौघुले बघतच बसले अन्…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 13, 2024 | 1:44 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Namrata Sambherao Video

Video : गवताचं पातं Is Back, ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवरच गाणं म्हणत नाचू लागले 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चे कलाकार, समीर चौघुले बघतच बसले अन्…

सोनी मराठी वाहिनीवरील कायमच चर्चेत असलेला असा आणि लोकप्रिय शो म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचे संपूर्ण जगभरात चाहते आहेत. या कार्यक्रमाने आजवर विनोदाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या पहिल्या भागापासून हास्यजत्रेला प्रेक्षकांचं प्रेम मिळू लागलं. समीर, प्रसाद, नम्रता, गौरव, वनिता आणि हास्यजत्रेतल्या इतर हास्यवीरांनी प्रेक्षकांना आपल्या विनोदांनी व प्रहसनांनी नवी उमेद दिली आहे. (Namrata Sambherao Video)

लॉकडाऊनच्या कठीण काळातही हा कार्यक्रम रसिकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी ठरला. कलाकारांच्या विनोदाने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. केवळ महाराष्ट्रातच नव्हेतर परदेशातील प्रेक्षकांचीही हास्यजत्रेची टीम अनेकदा परदेश दौरा करताना दिसते. काही दिवसांपूर्वीच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाची टीम सिंगापूर येथे दौऱ्याला गेली होती. सिंगापूर दौरा करताना ही कलाकार मंडळी त्यांच्या कुटुंबियांनाही बरोबर घेऊन गेले होते. त्यानंतर आता ही कलाकार मंडळी आणखी एका परदेश दौऱ्यावर गेले असल्याचं समोर आलं आहे.

आणखी वाचा – “प्रोमो पाहून प्रेक्षक हलले”, मालिकेतील नव्या ट्विस्टबाबत ‘आई कुठे…’ फेम अरुंधतीने केलं भाष्य, म्हणाली, ” मी स्वतः…”

View this post on Instagram

A post shared by Namrata Yogesh Sambherao (@namrata_rudraaj)

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाची टीम सध्या ऑस्ट्रेलिया येथील प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाली आहे. ही टीम सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असतानाचे अनेक फोटो, व्हिडीओ ही कलाकार मंडळी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन तेथे धमाल-मस्ती करतानाचे अनेक व्हिडीओ शेअर करत आहे. अशातच अभिनेत्री नम्रता संभेरावने ऑस्ट्रेलियाहून शेअर केलेल्या एका व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

आणखी वाचा – बायकोला पुरस्कार मिळताच नाचू लागला प्रसाद जवादे, पुरस्कार मिळाल्यानिमित्त अमृताला देणार ‘हे’ खास गिफ्ट, म्हणाला…

“गवताचं पात, वाऱ्यावर डोलतय…”, या नम्रताच्या गाण्याची क्रेझ सर्वत्र पसरली आहे. या गाण्यावर नम्रताचा स्किट नेहमीच चर्चेत असतो. आणि प्रेक्षकांच्याही पसंतीस पडतो. अशातच नम्रताने ऑस्ट्रेलियात जाऊन तेथील रस्त्यांवर हास्यजत्रेच्या टीमसह या गाण्यावर ठेका धरलेला पाहायला मिळाला. “गवताचं पातं ऑस्ट्रेलियात डोलतय, वेडेपणाचा कहर”, असं कॅप्शन देत तिने हा मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. स्वप्नील जोशी, स्पृहा जोशी या कलाकारांनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.

Tags: entertainmentmaharashtrachi hasyajatramhjnamrata sambheraoNamrata Sambherao Video
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Digambar Naik Controversy
Entertainment

‘दशावतार’ चित्रपटात दिगंबर नाईक पाहिजे होता?, अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाले, ” मालवणी माणूस नको…”

एप्रिल 14, 2026 | 12:21 pm
Next Post
kiran rao on aamir khan

किरण रावमुळे आमिर खानने पहिल्या पत्नीला दिला घटस्फोट?, पूर्वाश्रमीच्या पत्नीचा मोठा खुलासा, म्हणाली, "माझ्यामुळे रिना व तो…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.