‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून अभिनेता गौरव मोरेने एक्झिट घेतली असल्याची बातमी चर्चेत आली आहे. गौरवने या कार्यक्रमातून एक्झिट घेतली असल्याने चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर उमटलेला पाहायला मिळत आहे. गौरवने सोशल मीडियावरुन हास्यजत्रेतून कायमचा निरोप घेतला असल्याची खास पोस्ट शेअर केली. अचानक समोर आलेल्या या गौरवच्या बातमीने साऱ्यांना धक्का बसला. सोशल मीडियावरुन खास पोस्ट शेअर करत याबाबतची माहिती त्याने दिली. दरम्यान तो ‘मॅडनेस मचाएंगे’ या कार्यक्रमात तो पाहायला मिळत आहे. (Gaurav More Answers To Netizen)
गौरवने पोस्ट शेअर करत असं म्हटलं की, “नमस्कार, पवई फिल्टरपाड्यातून मी गौरव मोरे. तानानानाना. आरा बाप मारतो का काय मी…ये बच्ची… रसिक प्रेक्षक आपण या साध्या मुलाला खूप प्रेम दिलं. नाव दिलं. सन्मान दिला. त्याबद्दल मी व माझा परिवार आपले कायम ऋणी आहोत. मला सांगताना खूप वाईट वाटत आहे की मी गौरव मोरे आपल्या लाडक्या मालिकेतून म्हणजेच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मधुन आपला निरोप घेत आहे. माझ्या कामातून कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी त्या सगळ्यांची मनापासुन माफी मागतो”.
गौरवची ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून एक्झिट झाल्याचे समजताच एका नेटकऱ्याने कमेंट करत म्हटलं की, “गौरव सर मला वाटत आहे तुम्ही हा प्रॅन्क करत आहे. नवीन प्रोजेक्ट मिळाला असेल तर तुम्हाला खूप शुभेच्छा. मला तर हा प्रॅन्क वाटत आहे”, असं म्हणत नेटकऱ्याने कमेंट केली आहे. यावर उत्तर देत गौरवने त्याच कार्यक्रमातील एक्झिट बाबत भाष्य केलं आहे. गौरवने कमेंट करत म्हटलं आहे की, “मुद्दा नवीन प्रोजेक्टचा नाही आहे. असतात काही गोष्टी”, असं म्हणत त्याने नेटकऱ्याला उत्तर दिलं आहे.

आता अखेर गौरवने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडल्याचा दावा केला आहे. त्यामुळे त्याचे चाहते मंडळी त्याला हास्यजत्रेत मिस करत आहेत, हास्यजत्रेतून याआधी ओंकार भोजनेने एक्झिट घेतली. आता त्यानंतर गौरव मोरेने सोशल मीडियावर हास्यजत्रेला रामराम केला असल्याचं सांगितलं.