‘बिग बॉस’मुळे चर्चेत आलेला टांझानियाचा गायक अब्दू रोजिकने त्याच्या प्रेयसीबरोबर साखरपुडा उरकला आहे. त्याची कमी ऊंची, तसेच आवाज यामुळे त्याला भारतामध्ये खूप लोकप्रियता मिळाली होती. या कार्यक्रमामध्ये त्याचे नाव अभिनेत्री टिना दत्ता बरोबरही जोडले गेले होते. मात्र त्यांच्यामध्ये असे काहीही नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. पण आता त्याला त्याची आयुष्याची आणि त्याला हवी तशी समजून घेणारी साथीदार मिळाली आहे. त्याने इन्स्टाग्रामवर त्याबद्दलचा व्हिडीओदेखील शेअर केला होता. त्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. (abdu rozik engagement)
अब्दूचे वय २० वर्ष असून त्याची ऊंची ३ फुट आहे. त्याच्या ऊंचीमुळेदेखील अब्दू अधिक चर्चेत आला होता. त्याने आता त्याच्या अकाऊंटवरुन आपल्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत. अब्दूच्या बायकोचं नाव अमिरा असून ती शारजाह अमिरातमध्ये राहणारी आहे. अमिरा अब्दूपेक्षा एका वर्षाने लहान आहे.
याबद्दल अब्दूने ‘खलीज टाइम्स’बरोबर संवाद साधला. तेव्हा तो अमीराला कसा भेटला? दोघांची ओळख कशी वाढली? याबद्दल त्याने सांगितले. तो म्हणाला की, “या वर्षी मी अमीराला दुबईमधील Cipriani Dilci या मॉलमध्ये भेटलो. तिथे अमीरादेखील आली होती तेव्हा आमची भेट झाली”.
तसेच तो पुढे म्हणाला की, “अमिरा मला भेटली ही माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे. मला खूप प्रेम मिळत आहे. मला आता प्रत्येक दिवस आवडू लागला आहे. मी अल्लाहचे आभार मानतो की मला खूप समजूतदार पार्टनर मिळाली आहे. ती माझ्या आयुष्यात आल्याने सगळं खूप छान झालं आहे. ती माझी केवळ पार्टनर नसून प्रेम, ताकद, व शांती या सगळ्याच मिश्रण आहे”.
अब्दूच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तो टांझानियामधील एक लोकप्रिय गायक आहे. तसेच ‘बिग बॉस’ च्या १६ व्या पर्वातदेखील दिसून आला होता. बॉलिवूडमधील सगळेजण त्याचे चाहते आहेत. त्याचा जन्म माळी कुटुंबात झाला होता. त्याच्या ऊंचीवरुन खूप मस्करीदेखील केली जात असे. तो सुरुवातीला रस्त्यावरही गात असे. मात्र नंतर त्याच्या गाण्यांमुळे त्याला अधिक लोकप्रियता मिळाली.