शनिवार, जुलै 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम दत्तू मोरेची बायको झाली डॉक्टर, ठाण्यात स्वतःचं क्लिनिक सुरु केल्यानंतर कलाक्षेत्रामधून कौतुकाचा वर्षाव अन्…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 4, 2024 | 11:55 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Dattu More On Wife

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम दत्तू मोरेची बायको झाली डॉक्टर, ठाण्यात स्वतःचं क्लिनिक सुरु केल्यानंतर कलाक्षेत्रामधून कौतुकाचा वर्षाव अन्...

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने आजवर रसिक प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. हास्यजत्रेतील प्रत्येक कलाकाराने त्याच्या विनोदी कलाकौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. आजवर या कार्यक्रमातील विनोदी स्किटने साऱ्यांच्या मनाचा ठाव घेतला. महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्राबाहेरही या शोचे लाखो चाहते दिवाने आहेत. या शोमधील वन अँड ओन्ली असं व्यक्तिमत्त्व म्हणजे दत्तू मोरे. दत्तूने त्याच्या विनोदी कलेने त्याच्या खूप मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. काही दिवसांपूर्वीच दत्तू मोरे विवाहबंधनात अडकला. (Dattu More On Wife)

अत्यंत साधेपणाने व कोणताच गाजावाजा न करता दत्तूने लग्न केले. दत्तूने त्याची प्रेयसी स्वाती घुनागेसह विवाहबंधनात अडकला. दत्तू व स्वातीच्या लग्नाचे फोटो समोर येताच साऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. दत्तूची पत्नी ही पेशाने डॉक्टर आहे. स्वाती मुळची पुण्याची असून ती डॉक्टर आहे, विशेष म्हणजे तिचे पुण्यात स्वतःचे क्लिनिक देखील आहे. दत्तू व दत्तूच्या पत्नीने चाहत्यांसह आणखी एक गुडन्यूज शेअर केली आहे. दत्तू मूळचा मुंबईचा आहे. त्यामुळे लग्नानंतर स्वातीही मुंबईत आली आहे. इतकंच नव्हे तर, आता दत्तूच्या बायकोने मुंबईत तिचं स्वतःचं नवं क्लिनिक सुरु केलं असल्याचं समोर आले आहे.

आणखी वाचा – बॉलिवूडला कामाला लावलं, अंबानींच्या सुनेसाठी जान्हवी कपूर आरतीचं ताट घेऊन उभी, नेटकरी म्हणाले, “यांना जागा दाखवली…”

View this post on Instagram

A post shared by Datta More (@dattamore2870)

दत्तूने बायकोच्या या नव्या व्यवसायाची सोशल मीडियावरुन गुडन्यूज शेअर केली आहे. दत्तूने बायकोच्या नव्या क्लिनिकबाहेरचा फोटो शेअर करताच त्यावर अनेकांनी कमेंट करत दोघांवर शुभेच्छांचा वर्षांव केला आहे. प्रियदर्शिनी इंदलकर, प्रभाकर मोरे, चेतना भेट, श्याम राजपूत या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांनी तसेच अनेक चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. दत्तू व त्याच्या बायकोने टाकलेलं त्यांच्या आयुष्यातील या पावलाचं सगळेच कौतुक करत आहेत.

आणखी वाचा – Video : रॉयल एंट्री, जबरदस्त डान्स अन्…; ‘जीव माझा गुंतला’ फेम योगिता-सौरभच्या लग्नाचा थाटच न्यारा, नाचत मंडपात आली आणि…

सोशल मीडियावरही दत्तू बऱ्यापैकी सक्रिय असतो. नेहमीच तो काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. अशातच दत्तूने सोशल मीडियावरुन शेअर केलेल्या या पोस्टसह कॅप्शन देत त्याने लिहिलं आहे की, “आयुष्य कितीही कठीण वाटत असले तरी तुम्ही सोप्प करु शकता आणि यशस्वी होऊ शकता. घुनागे हॉस्पिटलनंतर बायकोचं ठाण्यातील पहिलं क्लिनिक. अजून एक नवीन सुरुवात. प्रिय बायको, तुला खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप प्रेम” असं म्हणत त्याने बायकोचं कौतुक करत तिला शुभेच्छाही दिल्या आहेत.

Tags: dattu moredattu more and swati ghunagedattu more wifedattu more wife informationentertainment
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Balumamachya navane changbhal serial new lead actor’s entry promo out

'बाळूमामाच्या नावानं चांगभलं'मधील बाळूमामांची भूमिका साकारणाऱ्या सुमित पुसावळेने सोडली मालिका, आता नव्या कलाकाराची एन्ट्री

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.