सध्या सर्वत्र दिवाळीची धामधूम पाहायला मिळत आहे. अनेकांच्या घरी विद्युत रोषणाई व पणती, रांगोळीची सजावट पाहायला मिळत आहे. एकूणच या दिव्यांच्या सणात संपूर्ण परिसर उजळून निघाला आहे. सर्वसामान्य असो किंवा कलाकार मंडळी, सर्वच जण हा आनंददायी सण साजरा करतानाचे चित्र सध्या दिसत आहे. मराठी कलाकार त्यांच्या व्यग्र कार्यक्रमातून वेळ काढत त्यांच्या कुटुंबियांसह दिवाळी साजरी करताना दिसतात. तसेच या सणानिमित्त अनेक फोटोज व व्हिडीओज चाहत्यांसह शेअर करत आहे. (Dattu More celebrates his first diwali after marriage)
मराठीतील अनेक कलाकार मंडळींची यंदा पहिली दिवाळी असल्यामुळे हे सर्व कलाकार मोठ्या धुमधडाक्यात दिवाळी साजरी करताना दिसत आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला लाडका अभिनेता दत्तू मोरे व त्याची पत्नी स्वाती मोरे यांची लग्नानंतरची ही पहिली दिवाळी आहे. यावेळी दत्तूने त्याच्या घरी पत्नीसह दिवाळीचा पहिला दिवस उत्साहात साजरा केला.
हे देखील वाचा – “कधीही रील बनवून नाचली नाही पण…”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याच्या आईचा धमाल डान्स, व्हिडीओ पोस्ट करत म्हणाला, “आयुष्यात सारंकाही…”
या दिवाळी सेलिब्रेशनचे काही फोटोज दत्तूने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले. त्याचबरोबर त्याने लक्ष्मीपूजनाचा एक फोटोदेखील शेअर केला. ज्यामध्ये दोघांनी पारंपरिक लूक केला असून या लूकमध्ये हे दोघे अतिशय सुंदर दिसत आहे. सोबत, लक्ष्मीपूजनाच्या या फोटोमध्ये विविध फराळ, नेवैद्य व पणत्यांची आरास केल्याचं दिसत आहे. त्याचबरोबर, यावेळी त्याच्या चाळीतील घराची झलक देखील दिसली आहे. दत्तूने या पोस्टसह त्याच्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
हे देखील वाचा – “हे मराठी कलाकार…”, अशुद्ध लिहिल्यानंतर कमेंट करणाऱ्यावर भडकली हेमांगी कवी, म्हणाली, “व्यवस्थित लिहिलेलं दिसत नाही आणि…”
दत्तूच्या पहिल्या दिवाळीचा हा फोटो व्हायरल होताच नेटकऱ्यांकडून लाईक्सचा वर्षाव होताना दिसत आहे. तसेच, अनेक चाहते “तुमच्या आयुष्यात ही दिवाळी खूप सुख आणि खूप सारं आनंद घेऊन येवो, तुमच्या आयुष्यात जी नाती आहेत आहे ती आणखी घट्ट होवो, तुम्ही आणि तुमचा परिवार कायम आनंदात आणि एकत्र राहो, तुमच्या आयुष्यातील दुःख लवकरच दूर होवो आणि तुम्हाला सगळ्या प्रॉब्लेम्स वर मार्ग मिळो, तुम्ही फराळा प्रमाणे गोड-तिखट आहात आणि तसेच रहा कायम”, अशी कमेंट करत दिवाळीच्या शुभेच्छा देत आहेत.