शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : पडद्यामागे तबला वाजवू लागले अरुण कदम, नाटकाच्या प्रयोगापूर्वी बॅकस्टेज धमाल, व्हिडीओ व्हायरल

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 3, 2024 | 3:46 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
arun kadam playing tabla video shared on instagram

Video : पडद्यामागे तबला वाजवू लागले अरुण कदम, नाटकाच्या प्रयोगापूर्वी बॅकस्टेज धमाल, व्हिडीओ व्हायरल

कलाकाराला त्याच्या अंगभूत कला या कधीही स्वस्थ बसू देत नाहीत आणि कलाकारही त्याच्या अंगभूत कलांना वाट मोकळी करुन देत असतो. असंच काहीसं झालं आहे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेते अरुण कदम यांच्याबरोबर. महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोनधून अरुण कदम हे सध्या प्रेक्षकांना हसवण्याचे  काम करत आहेत. मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते अरुण कदम यांनी आपल्या विनोदी शैलीनं वेगळीच छाप उमटवली आहे. ‘लाडका दादूस’ म्हणून त्यांची चांगलीच लोकप्रियता आहे. अरुण कदम यांनी आजवर अनेक रिअ‍ॅलिटी शोजमधून विनोदी भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. सध्या ते ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमातून प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचं काम करत आहे.

आपल्या विनोदी अभिनयाने चर्चेत राहणारे अरुण कदम हे सोशल मीडियाद्वारेही तितकेच चर्चेत राहत असतात. सोशल मीडियावर ते त्यांचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. तर कधी ते त्यांच्या लाडक्या नातवाचे काही मजेशीर व्हिडीओही शेअर करत असतात. त्यांच्या या फोटो व व्हिडीओला चाहत्यांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतो. अशातच अरुण कदम यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

View this post on Instagram

A post shared by Arun kadam (@ladka.dadus)

आणखी वाचा – नम्रता संभेरावने जुन्नरमधील गावात बांधलं हक्काचं घर, इतकं प्रशस्त आणि मोठी आहे जागा, शेअर केले गृहप्रवेशाचे फोटो

अरुण कदम यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ते तबला वादन करत असल्याचे पाहायला मिळत आहे. अरुण कदम हे वस्त्रहरण नाटकात काम करत असून् आच नाटकातील वेशभुषेमध्ये ते तबला वाजवत असल्याचे पाहायला मिळत आहेत. दरम्यान् तबला वाजवत असतानाची तारांबळही या व्हिडीओमधू दिसत आहे. तरीही तबला वाजवतानाचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत असल्याचे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा –

आणखी वाचा – Video : पंढरीच्या वारीमध्ये दंग झाला सुप्रसिद्ध मराठी अभिनेता, वारकऱ्यांबरोबर रमला अन्…; साधेपणाचं होतंय सर्वाधिक कौतुक

अरुण कदम यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओला चाहत्यांनीही चांगलाच प्रतिसाद दिला आहे. “दादा मस्तच”, “छान”, “खोडकर अरुण दादा” अशा अनेक कमेंट्स करत या व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे. दरम्यान, ‘वस्त्रहरण’ या नाटकातूनही प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. ‘वस्त्रहरण’ या नाटकाची सध्या रंगभूमीवर प्रचंड चर्चा सुरु आहे आणि या नाटकात अरुण कदम यांनी शकुनी मामाची भूमिका साकारत आहेत.

Tags: arun kadamArun Kadam Tabla Playing Videomaharashtrachi hasyajatramarathi entertainment news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Next Post
Jahnavi Killekar Incident

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या पेणमधील घरात चोरी, 'ते' दृश्य पाहून आईला पॅरालिसीसचा अटॅक, म्हणाली, "आई-बाबा घरी पोहोचले तेव्हा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.