शनिवार, सप्टेंबर 12, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

डोळ्याचा मोठा त्रास, एका नसमुळे…; आजारपणामुळे ओंकार भोजनेची झाली होती अशी अवस्था, काम करणंही जमत नव्हतं कारण…

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑक्टोबर 13, 2023 | 6:09 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
onkar bhojane health

onkar bhojane health

मराठीमध्ये ‘बॉईज’ चित्रपटाच्या तीन भागांना प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला. चित्रपटाच्या तिन्ही भागांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. आता ‘बॉईज ४’ प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. या चित्रपटामध्ये गौरव मोरे, निखिल बने, पार्थ भालेराव, सुमंत शिंदे अशा कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर, गाणी पाहिल्यानंतर प्रेक्षक ‘बॉईज ४’ची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण या चित्रपटामध्ये ओंकार भोजने दिसणार नसल्यामुळे प्रेक्षक नाराज झाले आहेत. (Onkar Bhojane Health Issue)

ओंकार ‘बॉईज ४’मध्ये दिसणार असल्याची चर्चा होती. मात्र ट्रेलर, टीझर प्रदर्शित झाल्यानंतर ओंकार कुठेच दिसला नाही. याबाबत प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली. पण तो या चित्रपटामध्ये का नाही? याबाबत खरं कारण आता समोर आलं आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक विशाल देवरुखकर यांनी ओंकार चित्रपटामध्ये का नाही? याबाबत खुलासा केला आहे.

आणखी वाचा – “तो खूप सिगारेट ओढायचा अन्…”, हर्षदा खानविलकरांनी सांगितलेली वडिलांची निधनापूर्वीची अवस्था, म्हणालेल्या, “बाबा गेला तेव्हा…”

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ओंकारबाबत विशाल यांना विचारण्यात आलं. याबाबत ते म्हणाले, “ओंकार आता चित्रपटामध्ये आमच्या बरोबर नाही. आम्ही चित्रपटाचं चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला तेव्हा ओंकारला शारिरीक बराच त्रास होता. ही गोष्ट बहुतेक कोणालाच ठाऊक नाही. त्याला डोळ्याचा खूप मोठा त्रास झाला होता. त्याची नस कुठेतरी त्रासदायक ठरत होती. दरम्यान त्याला पूर्ण बेडरेस्ट सांगितली होती. ‘बॉईज ४’साठी आम्ही ओंकारशी खूप चर्चा केली. पण त्याने स्वतःहून सांगितलं की, तुर्तास या चित्रपटासाठी मी थांबतो”.

आणखी वाचा – “मला नाकारतात कारण…”, कामासाठी वणवण फिरतोय बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता, म्हणाला, “ऑडिशनसाठी जातो मात्र…”

“पुढच्या चित्रपटामध्ये मी तुमच्याबरोबर काम करेन. आता माझ्याकडून काम होणार नाही. मी स्वतःहून त्याची हालत पाहिली आहे. तो खूप आजारी असता. त्यादरम्यान त्याच्या हाती इतरंही काम होतं. आम्ही समजूतीने हा निर्णय घेतला. ओंकारनेही स्वतःहून चित्रपटात काम न करण्याचा निर्णय घेतला. प्रेक्षक याबाबत नाराज आहेत यासाठी मी दिलगीरी व्यक्त करतो. पण तो अजूनही ‘बॉईज’च्या कुटुंबाचा भाग आहे. यापुढे भविष्यात तो ‘बॉईज’मध्ये असेल. त्याच्या तब्येतीने त्याला साथ दिली नाही. पण नक्कीच तो नव्या जोमाने काम करेल”. ओंकारने आता नव्या जोमाने काम करण्यास सुरुवात केली आहे.

Tags: marathi actormarathi movieonkar bhojane
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Kaakul Marathi Movie
Entertainment

‘काकुळ’च्या थरारक रहस्याचा उलगडा होणार नोव्हेंबरमध्ये, मोनालिसा बागलची प्रमुख भूमिका

सप्टेंबर 9, 2026 | 9:50 am
Dashami Movie Song
Entertainment

‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत

सप्टेंबर 9, 2026 | 9:40 am
Daryabhavani Marathi Movie
Entertainment

‘दर्याभवानी’ साठी दिग्पाल लांजेकरांचे अनोखं गाऱ्हाणं, शूटिंगला सुरुवात, होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

सप्टेंबर 9, 2026 | 9:32 am
Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Next Post
Jui Gadkari On Ask Me Anything

"लहानपणापासून मला…", चॅनलमध्ये नोकरी करत होती 'ठरलं तर मग' फेम जुई गडकरी, म्हणाली, "रोज उठून कामावर…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.