अशी अनेक कलाकार मंडळी आहेत जी त्यांच्या कुटुंबाबरोबरचे अनेक आनंदी क्षण नेहमीच सोशल मीडियाद्वारे शेअर करताना दिसतात. अनेकदा ही कलाकार मंडळी गावाकडच्या आठवणी, अनुभव सोशल मीडियावरुन नेहमीच शेअर करतात. अशातच सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत एका अभिनेत्रीच नाव आवर्जून घेतलं जातं ते म्हणजेच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेराव. सोशल मीडियावरुन नम्रता नेहमीच तिच्या कुटुंबाबरोबरचे अनेक फोटो, व्हिडीओ शेअर करताना दिसते. शिवाय चाहत्यांबरोबरचे अनेक अनुभवही ती वेळोवेळी शेअर करते. (Namrata Sambherao Post)
अशातच नम्रताने शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून नम्रताने आजवर प्रेक्षकांच्या मनात घर गेलं. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील नम्रता संभेराव ही अभिनेत्री ‘लॉली’ हे पात्र साकारते. सचिन गोस्वामी व प्रसाद खांडेकर यांच्या लेखणीतून लॉली हे पात्र साकारले गेले असून अभिनेत्रीने तिच्या अभिनयामुळे हे पात्र आणखी फुलवले आहे. त्यामुळे या पात्राची सोशल मीडियासह अनेक प्लॅटफॉर्म्सवर लोकप्रियता पाहायला मिळते. सोशल मीडियावर लहान मुलांपासून ते अगदी वयोवृद्धांमध्ये या लॉली पात्राची क्रेझ पाहायला मिळते.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi च्या घरात पुन्हा एकदा निक्कीची मनमानी, सर्व नियम मोडले अन्…; शिक्षा होणार का?
“जागरण गोंधळ. विश्वाच्या शक्तीवर विश्वास ठेवा. विशेष नमूद करायचं म्हणजे संभेराव घराण्याला जागरण गोंधळाची परंपरा आहे. माझे आजेसासरे दगडू संभेराव खूप मोठे गोंधळी होते. त्यांच्या संबळचा आवाज ऐकायला आणि ते पाहायला गाव लोटायचा. त्यांच्याशी प्रत्यक्ष भेट नाही होऊ शकली पण माझे चुलत सासरे हा वारसा चालवत आहेत आणि या अशा कुटुंबाचा भाग असल्याचा मला प्रचंड अभिमान आहे. कला माझ्या अवतीभवतीच आहे”, अशी पोस्ट नम्रताने शेअर केली आहे.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi : सहाव्या आठवड्यात ‘हे’ स्पर्धक झाले नॉमिनेट, कोण घराबाहेर जाणार? आणि कोण सुरक्षित होणार?
नम्रताने तिच्या सासरच्या गावी जात जागरण गोंधळचा अनुभव घेतला. नम्रताने जागरण गोंधळमध्ये नाचतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. यावेळी नम्रताला तिचा नवराही साथ देताना दिसत आहे. संपूर्ण संभेराव कुटुंब या जागरण गोंधळमध्ये धमाल करताना दिसत आहेत.. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.