सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

प्राजक्ता माळीचं भाचींबरोबर आहे खास बॉण्डिंग, भेटायला थेट सेटवर आल्या अन्…; व्हिडीओ शेअर करत अभिनेत्री म्हणाली, “नुसता उच्छाद…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 31, 2024 | 9:32 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Prajakta Mali Niece Video

प्राजक्ता माळीचं भाचींबरोबर आहे खास बॉण्डिंग, भेटायला थेट सेटवर आल्या अन्...; व्हिडीओ शेअर करत अभिनेत्री म्हणाली, "नुसता उच्छाद..."

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत प्राजक्ताने लोकप्रियता मिळवली आहे. वाह दादा वा या तिच्या टॅगलाईनची तर सर्वत्र चर्चा रंगलेली असते. प्राजक्ताने आजवर तिच्या अभिनय कारकीर्दीत खूप यश मिळवलं आहे. अभिनय, नृत्याची आवड जोपासणाऱ्या प्राजक्ताने ही आवड जोपासत प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. इतकंच नव्हे तर प्राजक्तांने मालिका विश्वातूनही तिच्या अभिनयाची छाप सोडत प्रेक्षकांची मन जिंकली आहे. (Prajakta Mali Niece Video)

प्राजक्ताच सौंदर्य तर प्रत्येक तरुणाईला भुरळ घालत असत. खूप मोठा चाहता वर्ग असलेल्या या प्राजक्ताचा सोशल मीडियावर ही बऱ्यापैकी वावर आहे. नेहमीच काही ना काही ती शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. इंस्टाग्राम अकाउंटवरूनही ती हटके फोटोशूट शेअर करताना दिसते. इतकंच नव्हे तर ती तिच्या कुटुंबाबरोबरचे ही व्हिडीओ, फोटो नेहमी शेअर करत असते. विशेषतः प्राजक्ता तिच्या दोन गोड भाचीचे व्हिडीओ नेहमी शेअर करताना दिसते.

आणखी वाचा – सावत्र मुलीबरोबर असं आहे दिया मिर्झाचं नातं, फोटो शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांकडूनही कौतुक, म्हणाले, “स्वतःची आईही असं…”

प्राजक्ताप्रमाणे तिच्या दोन गोड भाची ही प्रेक्षकांच्या लाडक्या आहेत, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. अशातच प्राजक्तांने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरुन शेअर केलेल्या एका व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतले आहे. प्राजक्ताच्या दोन्ही भाची या तिला भेटण्यासाठी तिच्या सेटवर आल्या असल्याचे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतेय. घरी जशा दोघी धिंगाणा करत असतात तशाच त्या सेटवर जाऊनही धिंगाणा करत असल्याचं तिने या व्हिडीओमधून शेअर केल्याचं पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – “लोकांना जाड व बारीक यापलीकडे काहीच दिसेना”, शारीरिक रचनेवरुन सई लोकूरला सतत हिणावत आहेत लोक, अभिनेत्री भडकली, म्हणाली, “एखाद्या आईने…”

हा व्हिडीओ शेअर करत प्राजक्तांने कॅप्शन देत असे म्हटले आहे की, “जेव्हा तुमच्या भाची तुम्हाला भेटायला सेटवर येतात, उच्छाद, जो इथे दिसत नाही आहे”, असं म्हटलं आहे. प्राजक्ता व तिच्या भाचीच खास बॉण्डिंग नेहमीच पाहायला मिळतं. आत्याचं शेपूट असं देखील प्राजक्ताच्या भाचींना म्हटलं जातं. नेहमीच त्या प्राजक्ताच्या अवतीभोवती घिरट्या घालताना दिसतात. प्राजक्ताचंही तिच्या भाचीवर खूप प्रेम आहे.

Tags: entertainmentprajakta maliprajakta mali instagramPrajakta Mali Niece Video
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Aishwarya Narkar On Negative Comment

"हिचं ऍक्सिडंट का होत नाही", निगेटिव्ह प्रतिक्रियांबाबत ऐश्वर्या नारकरांचं भाष्य चर्चेत, म्हणाल्या, "प्रेक्षकांच्या डोक्यात…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.