Prasad Khandekar Wedding Anniversary : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून अनेक कलाकार प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसतात. यापैकीच एक कलाकार म्हणजे प्रसाद खांडेकर. प्रसाद खांडेकरने आजवर आपल्या विनोदी अभिनयाने, विनोदाच्या उत्तम टायमिंगने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अभिनयाबरोबरच प्रसाद उत्तम दिग्दर्शक व निर्माता म्हणून सध्या सिनेविश्वात कार्यरत आहे. अभिनयासंबंधी तो नेहमीच काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. इतकंच नव्हे तर तो कुटुंबाबरोबरच्या पोस्टही नेहमीच शेअर करताना दिसतो. बायको, मुलाबरोबरचे अनेक फोटो, व्हिडीओ तो शेअर करत असतो. अशातच प्रसादने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर बायकोसाठी खास पोस्ट शेअर केली आहे; त्याच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
प्रसाद खांडेकर सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतो. आपल्या कामासह वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी तो वेळोवेळी शेअर करताना दिसतो. नुकतीच अभिनेत्याने लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने बायकोसाठी खास पोस्ट लिहिली होती. इतकंच नाही तर प्रसादने बायकोसाठी खास गिफ्टही घेतल्याचं पाहायला मिळालं. तर प्रसादच्या बायकोनेही त्याला रिटर्न गिफ्ट दिल्याचं दिसलं. सोशल मीडियावर त्याने या गिफ्टचा फोटो काढून पोस्ट केला आहे.
आणखी वाचा – अंकिता वालावलकरने लिहिलं ‘झी मराठी’च्या नव्या मालिकेचं प्रोमो सॉंग, नवऱ्यासह व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक
अभिनेता प्रसाद खांडेकरने बायको अल्पा खांडेकरबरोबर फोटो शेअर करत लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको. बस तू आहेस बरोबर म्हणून तुझ्या साथीने एक एक टप्पा पार करतोय. अजून खूप टप्पे पार करायचे आहेत. जसं प्रोत्साहन देत पुढे ढकलतेस तसंच प्रसंगी घट्ट पाय रोवून ठेहराव पण घ्यायला लावतेयस. प्रेमाची ९ वर्ष आणि लग्नाची ११ वर्ष. एकूण २० वर्ष कशी गेलीत कळलं नाही”, असं लिहित प्रसादने बायकोला शुभेच्छा दिल्या आहेत.
बायकोसाठी खास पोस्ट केल्यानंतर प्रसादने गिफ्टचा फोटो शेअर केला. प्रसादने बायकोला लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने लॅपटॉप गिफ्ट केला आहे. तर रिटर्न गिफ्ट म्हणून अल्पाने अभिनेत्याला खास दागिना दिला आहे. प्रसाद त्याच्या बायकोबरोबरचे नेहमीच फोटो शेअर करत असतो. प्रसादची बायकोही उद्योजिका आहे. स्वीट मेमरीज या नावाने ती केक, चॉकलेटचा व्यवसाय करते.