मध्यम वर्गीय कुटूंबातील प्रत्येक व्यक्तीच एक स्वप्न असत ते म्हणजे स्वतःची एक चार चाकी गाडी असंन. मध्यम वर्गीय कुटुंबातून पुढे आलेला असाच एक अभिनेता ज्याचं देखील स्वतःची चार चाकी घेण्याचं स्वप्न पूर्ण झाल्याचं पाहायला मिळतंय. अभिनेता ओंकार राऊत ने त्याच्या इन्स्टा ग्राम अकाउंट वरून गाडी सोबतच एक फोटो करत हे आनंदाची बातमी प्रेक्षकां सोबत शेअर केली आहे.(Onkar Raut Happy Moment)

ओंकार ने पोस्ट केलेल्या गाडी सोबतच्या कॅप्शन मध्ये त्याने ‘ 24/04/2023 ला नवी baleno घरी आली. अक्षयतृतीयेला गाडी घेता आली नाही पण योगायोगाने सचिन तेंडुलकरच्या वाढदिवसा ला ती घरी आली! (साडे तीन मुहूर्तांपैकी नसला तरी हा ही देवाचाच दिवस! )
सचिन च्या average एवढा, तिचं mileage असावं! सचिन च्या runs एवढे, तिचे kilometers व्हावे! सचिनच्या straight drive एवढी smooth तिची drive असावी! Welcome Home Baleno!!! असं म्हणत नवीन गाडीचं स्वागत केलं आहे.(Onkar Raut Happy Moment)
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कॉमेडी शोमधून अभिनेता ओंकार राऊत घराघरात पोहोचला. त्याने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनातही घर केलं आहे. विनोदीबुद्धी आणि अभिनय कौशल्याने त्याने अल्पावधीतच कलाविश्वात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. याच कार्यक्रमातून ओंकारला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. दादरचा अमोल पालेकर अशी एक मजेशीर ओळख सुद्दा ओंकार बद्दल सांगितली जाते.
हे देखील वाचा – हास्यजत्रा घेणार प्रेक्षकांचा निरोप?हास्यजत्रेतील कलाकाराची पोस्ट चर्चेत