यंदाच्या बहुचर्चित चित्रपटांच्या यादीत एक नाव अग्रेसर आहे ते म्हणजे साऊथ स्टार प्रभासची मुख्य भूमिका असलेला आणि मराठमोळा दिगदर्शक ओम राऊत दिगदर्शित करत असलेला आदिपुरुष. सुरुवातीला वादाच्या भोवऱ्यात अडकलेला चित्रपट सध्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे तो चित्रपटाच्या टिझर आणि नुकत्याच लाँच झालेल्या गाण्यांमुळे. आदिपुरुष चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा आज पार पडला. या चित्रपटाचं दिगदर्शन मराठमोळ्या ओम राऊत ने केलं. चित्रपटात आणखी एक मराठी अभिनेता महत्वाच्या भूमिकेत झळकणार आहे तो अभिनेता म्हणजे जय मल्हार मालिकेतूंन घरोघरी पोहचलेला अभिनेता देवदत्त नागे.(Adipurush Music Launch)
चित्रपटाच्या म्युजिक लाँच प्रसंगी देवदत्त नागे ने जय श्री रामच्या घोषणा देत मंचावर एन्ट्री घेतली आणि जमा असलेल्या जमावातून एकच जय श्री रामचा आवाज उमटला.विशेष म्हणजे या चित्रपटातील गाणं सुद्दा मराठीतील सुप्रसिद्ध जोडी अजय अतुल यांनी गायलं आहे. चित्रपटाच्या या म्युजिक लाँच सोहळ्यात अजय अतुल सुद्धा भारावलेले पाहायला मिळाले. काही वेळातच पोस्ट करण्यात आलेल्या गाण्याने १ मिलिअन्सचा टप्पा गाठला आहे.
आदिपुरुष या चित्रपटाला प्रचंड विरोध दर्शवण्यात आला. चित्रपटातील काही दृश्यांमुळे समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप काही घटकांकडून करण्यात आला होता. चित्रपटाचं दिगदर्शन मराठी दिगदर्शक ओम राऊत यांनी केले असून त्यामुळे मराठी दिगदर्शकाला पाठिंबा द्या म्हणून मनसे ने देखील आव्हान केले होते.(Adipurush Music Launch)