प्रेक्षकांच्या मनोरंजनाचं हक्काचं स्थान असलेला एक कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्राची हास्य जत्रा. अनेक तुफानी विनोदी स्किट्स, विनोदांमध्ये असलेलं नावीन्य, कलाकारांच्या निरनिरळ्या विनोद शैली या सर्व गोष्टींमुळे महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या अगदी जवळचा आहे. समीर चौघुले, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, वनिता खरात, गौरव मोरे, इशा दे, प्रियदर्शनी इंदलकर, प्रभाकर मोरे, निखिल बने अशा अनेक कलाकारांच्या धमाल विनोदांनी हा कार्यक्रम अधिकाधिक समृद्ध झाला आहे.(MHJ Last Episode)
पण आता या कार्यक्रमा बद्दल एक बातमी समोर येत आहे ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये काहीशी नाराजी पाहायला मिळू शकते. हास्यजत्रेत परफॉर्म करणाऱ्या इशा ने एक स्टोरी तिच्या इंस्टाग्राम अकाउंटला शेअर केली आहे ज्यात तिने ‘ Lst Day Of Season On This Set ‘ असं कॅप्शन दिलं आहे . इशाची ही स्टोरी पाहून आता हा कार्यक्रम बंद होणार का? असा प्रश्न चाहत्यांच्या मनात उद्भवला आहे. तर पुढे प्रेक्षकांना हास्य जत्रा पाहायला मिळणार का? या सगळ्या प्रश्नांबद्दल जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुरलेले दिसत आहेत.(MHJ Last Episode)