शुक्रवार, मे 30, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

महाराष्ट्र शाहीरमधील ‘बहरला हा मधुमास…’ हे प्रेमगीत तरुणाईला पाडतंय भुरळ

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 28, 2023 | 9:08 am
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
maharashtra shahir

maharashtra shahir

‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाची उत्सुकता साऱ्यांनाच लागून राहिली आहे. चित्रपटाचे पहिले मोशन पोस्टर हे वाऱ्यासारखे सोशल मीडियावर तुफान गाजले होते. आता ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटातील मराठी भाषा दिनाचे औचित्य साधत एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. अनेक वैशिष्ट्यपूर्ण असा हा चित्रपट  रिलीज आधीच प्रचंड चर्चेत आहे. मराठी भाषादिनी प्रदर्शित झालेले ‘बहरला हा मधुमास…’ हे गाणे असेच एक वैशिष्ट्य अधोरेखित करणार आहे. (maharashtra shahir)

एकीकडे पांढरपेशा सवर्ण समाजातील रेखीव मराठी म्हणजे भानूमती, म्हणजेच शाहिरांची सुविद्य पत्नी आणि कवयित्री भानुमती. तर दुसरीकडे कृष्णाकाठच्या सातारी मातीत रुजलेली रांगडी मराठी म्हणजे कृष्णा म्हणजेच कृष्णराव गणपतराव साबळे अर्थात आपले शाहीर साबळे.

मराठी भाषेतले हे दोन परस्पर विरोधी रंग या नव्या कोऱ्या प्रेमगीताच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मराठी भाषा दिनाचे दिवशी सादर झालेले हे प्रेमगीत १९४२ सालच्या रंगात रंगलेले पाहायला मिळतेय तर २०२३ सालच्या तरुणाईला हे प्रेमगीत रंगात रंगवून टाकेल यांत शंका नाही. (maharashtra shahir)

‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटात अभिनेता अंकुश चौधरीला शाहीर साबळे यांच्या भूमिकेत पाहणं रंजक ठरेल तर सना शिंदे शाहीर साबळेंच्या पत्नीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. सना शिंदे ही दिग्दर्शक केदार शिंदे यांची मुलगी असून ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटातून ती सिनेविश्वात पाऊल टाकण्यास सज्ज झाली आहे. यांच्यासह चित्रपटात अतुल काळे, अमित डोलावत हे कलाकारही झळकणार आहेत. ‘बहरला हा मधुमास…’ या गाण्यात सनाचा एक आगळावेगळा अंदाज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय.

====

हे ही वाचा – रंगभूमीवर लागू होणार ‘नियम व अटी’! संकर्षण कऱ्हाडे लिखित नवीन नाटकाची घोषणा

====

‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटातील हे गाणे गुरु ठाकूर यांनी शब्दबद्ध केले आहे. तर सुप्रसिद्ध गायक अजय गोगावले आणि व्हर्सटाईल गायिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रेया घोषालने हे गाणे सुरबद्ध केले आहे. तर संपूर्ण चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी अजय-अतुल यांनी सांभाळली आहे. ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाचीची प्रस्तुती ‘एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट’ आणि केदार शिंदे प्रॉडक्शन्सची आहे.  चित्रपटाचे निर्माते म्हणून संजय छाब्रिया आणि बेला केदार शिंदे यांनी बाजू सांभाळली आहे. (maharashtra shahir)

“हे एक प्रेमगीत असून शाहीर साबळे आणि त्यांच्या पत्नी भानुमती यांच्या प्रेमाची कथा त्यातून अलगद उलगडत जाते. शाहीर म्हणजे माझे आजोबा हा अस्सल सातारी रांगडा गडी तर माझी आजी ही शहरी पार्श्वभूमी असलेली एक सुविध्य तरुणी. कलेच्या एका धाग्याने दोघेही एकत्र आलेले आणि जणू एकमेकांसाठीच जन्मलेले. ‘बहरला हा मधुमास…’मधून त्यांच्या प्रेमकथेचा जणू एक आगळा आविष्कारच समोर येतो. गीतकार आणि संगीतकारांनी या गाण्याला उत्तम न्याय दिला आहे,” असे चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी म्हटले आहे. (maharashtra shahir)

येत्या २८ एप्रिलला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. 

Tags: ankush chaudharieverest entertainmentkedar shindemaharashtra shahirnew movienew songsana shindeupcoming movie
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

SEBI bans Arshad Warsi
Entertainment

अर्शद वारसी व त्याच्या पत्नीवर मोठी कारवाई, शेअर बाजारात घोटाळा केल्याप्रकरणी SEBIचा महत्त्वपूर्ण निर्णय, नक्की प्रकरण काय?

मे 30, 2025 | 2:56 pm
Vaishnavi Hagawane death
Entertainment

“वैष्णवीच्या चारित्र्यावर बोट ठेवलं नाही”, हगवणेंचा वकील ट्रोल होताच दिलं स्पष्टीकरण, म्हणाला, “पुरावे दाखवून…”

मे 30, 2025 | 2:30 pm
Surveen chawla casting couch
Entertainment

जबरदस्ती किस, त्याने बघताच पँटमध्ये हात घालत…; बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्रीबरोबर किळसवाणा प्रकार, धावत सुटली अन्…

मे 30, 2025 | 2:15 pm
casting couch incident
Entertainment

“तुझे अंतर्वस्त्र काढून माझ्या हातात दे”, बॉलिवूड अभिनेत्रीकडे दिग्दर्शकाची विचित्र मागणी, संतापून म्हणाली, “मार इथे खाणार की…”

मे 30, 2025 | 12:42 pm
Next Post
virajas kulkarni

आईची माया आणि बायकोचं प्रेम, वाढदिवसानिमित्त विराजसला मिळालं खास गिफ्ट

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.