बुधवार, जुलै 29, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“वैष्णवीच्या चारित्र्यावर बोट ठेवलं नाही”, हगवणेंचा वकील ट्रोल होताच दिलं स्पष्टीकरण, म्हणाला, “पुरावे दाखवून…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 30, 2025 | 2:30 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Vaishnavi Hagawane death

"वैष्णवीच्या चारित्र्यावर बोट ठेवलं नाही", हगवणेंचा वकील ट्रोल होताच दिलं स्पष्टीकरण, म्हणाला, "पुरावे दाखवून…"

Vaishnavi Hagawane death :  पुण्यातील मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण आता वाढतच चालले आहे. सासरच्या अमानुष छळाला वैतागून वैष्णवीने आत्महत्येसारखं मोठं पाऊल उचललं. सासरच्या मानसिक आणि शारिरीक त्रासाला कंटाळून वैष्णवी शशांक हगवणे (वय 23) हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आता वैष्णवी प्रकरणाने न्यायालयाची पायरी चढली आहे. वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यूनंतर संपूर्ण हगवणे कुटुंब पोलिसांच्या ताब्यात आहे. अशातच, आरोपी हगवणे कुटुंबाच्या वकिलाने पुढे येत मृत वैष्णवीवर आरोपांची आतिषबाजी केली. वैष्णवीच्या चारित्र्यावर शंका उपस्थित करत कोर्टात युक्तिवाद केला. त्यामुळे, आरोपी हगवणेंचे वकील विपुल दुशिंग चर्चेत आले आहेत.

आरोपी हगवणेंचे वकील विपुल दुशिंग यांच्या वक्तव्याने त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होताना पाहायला मिळत आहे. याचबरोबर, आरोपींच्या बाजूने लढणारा वकीलच गुन्हेगार असल्याचं समोर आलं. तीन वर्षांपूर्वी विपुल यांच्यावर सरकारी वकिलाला कॉलर पकडून मारहाण केल्याप्रकरणाचा गुन्हा आहे. न्यायालयाने त्यावेळी अटक पुर्व जामीन दिल्याने दुशींग यांची अटक त्यावेळी टळली होती. वकिलांनी केलेला युक्तिवाद कोणालाच पटला नसून त्यांच्यावर टीकेची झोड उमटवली जात असतानाच आता स्वतः विपुल दुशिंग यांनी या टीकेवर आपली बाजू मांडली आहे.

आणखी वाचा – “तुझे अंतर्वस्त्र काढून माझ्या हातात दे”, बॉलिवूड अभिनेत्रीकडे दिग्दर्शकाची विचित्र मागणी, संतापून म्हणाली, “मार इथे खाणार की…”

‘टीव्ही ९’ सह संवाद साधताना त्यांनी या टीकेबाबत भाष्य केलं. ते म्हणाले, “मी वैष्णवी हगवणेच्या चारित्र्यावर बोट ठेवले नाही. तर हगवणे कुटुंबाची बाजू मांडल्याने माझ्यावर टीका होतेय. माणूस म्हणून वैष्णवीसाठी वाईट वाटतंय पण मी माझी ड्युटी करत आहे. माणूस म्हणून त्या मुलींसाठी मला वाईट वाटतंय. लहान वयात तिचा मृत्यू झाला आहे, तिला एक लहान बाळ आहे यासाठी मला वाईट वाटत आहे. आता हे वाईट वाटणं मला माझी ड्युटी करण्यापासून थांबवू शकत नाही. माणूस म्हणून मी वावरतो तर हे प्रकरण ऐकून मला वाईटच वाटतंय. आम्ही आरोपीचा बचाव करत असतो, त्याच्याकडून रीतसर मुद्दे मांडत असतो. आम्ही त्या आरोपीने केलेल्या वाईट कृत्याचा बचाव करत नाही आहोत. आम्ही पुरावे दाखवून आमची बाजू मांडत असतो आता बाकीच्या गोष्टी या न्यायालयावर आधारित आहेत. शेवटी न्यायालयाचा निर्णय सर्वश्रेष्ठ आहे”.

आणखी वाचा – हगवणेंना पाठीशी घालणारा वकीलच आरोपी, तीन वर्षांपूर्वीच मारहाणीचा गुन्हा दाखल, वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेताच…

वैष्णवीची टेंडंसी ही सुसाईड करण्याची होती, तिचा एका व्यक्तीबरोबरचा संवादही समोर आला आहे. त्यातून तिने अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. एकदा रॅट पॉइझन खाऊन आणि एकदा गाडीतून उडी मारुन तिने जीवन संपवण्याचा प्रयत्न केला, शिवाय नवऱ्याने चार कानाखाली मारले म्हणजे छळ नाही, असा धक्कादायक दावा राजेंद्र हगवणेंचे वकील विपुल यांनी न्यायालयात केला.

Tags: dowry casepune crime newsVaishnavi Hagawane death
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

dev anand son suneil anand dies
Entertainment

देव आनंद यांच्या मुलाचे निधन, ७०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, अविवाहित राहिले कारण…

जुलै 29, 2026 | 10:34 am
 Badshah Isha Rikhi Marriage in Trouble
Entertainment

“मी गप्प राहिले कारण मला भीती वाटत होती”, सुप्रसिद्ध गायकाच्या पत्नीची धक्कादायक पोस्ट, चार महिन्यांपूर्वीच झालेलं लग्न…

जुलै 28, 2026 | 10:24 am
stories of Abhay Verma
Entertainment

मुलांनी घेरलं, घाणेरडं कृत्य केलं आणि…; भूमिकेची तयारी करताना सुप्रसिद्ध अभिनेत्याला समजलं होतं ट्रान्सजेंडर, म्हणालेला…

जुलै 27, 2026 | 11:10 am
Jasmin Bhasin Health Update
Entertainment

“मला गंभीर आजार आहे”, सुप्रसिद्ध अभिनेत्रीवर दुबईच्या रुग्णालयात सुरु होते उपचार, खूप वेदना आणि…

जुलै 27, 2026 | 9:55 am
Next Post
SEBI bans Arshad Warsi

अर्शद वारसी व त्याच्या पत्नीवर मोठी कारवाई, शेअर बाजारात घोटाळा केल्याप्रकरणी SEBIचा महत्त्वपूर्ण निर्णय, नक्की प्रकरण काय?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.