शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

शपथविधीसाठी बॉलिवूड कलाकारांची आझाद मैदानात गर्दी, मुकेश अंबानीचीही हजेरी

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 5, 2024 | 5:41 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Celebrities in Oath Taking Ceremony 

शपथविधीसाठी बॉलिवूड कलाकारांची आझाद मैदानात गर्दी, मुकेश अंबानीचीही हजेरी

Celebrities in Oath Taking Ceremony  : आज महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. देवेंद्र फडणवीस आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. मुंबईतील आझाद मैदानावर आज सायंकाळी साडेपाच वाजता शपथविधी सोहळा होणार आहे. या शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान मोदीही सहभागी होणार आहेत. याआधी बुधवारी महाराष्ट्र भाजप विधीमंडळ पक्षाच्या बैठकीपूर्वी समितीच्या बैठकीत फडणवीस यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि फडणवीस उपस्थित होते. भाजपने सीतारामन आणि रुपाणी यांना पक्षाच्या महाराष्ट्र विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी आमंत्रित केले आहे.

आज राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार आणि एकनाथ शिंदे शपथ घेतील अशी चर्चा आज दिवसभर होती. मात्र एकनाथ शिंदे यांचा शपथविधी होणार की नाही याबाबात अनेक संभ्रम निर्माण झाले होते. त्यानंतर आता एकनाथ शिंदे हे देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. या कार्यक्रमाला आता आझाद मैदानावर सुरुवात झाली आहे.

आणखी वाचा – जहागीरदारांच्या घरात लीला पुन्हा येणार का?, एजेंच्या एका निर्णयावर संसार सुरळीत होणार? कथा निर्णायक वळणावर

#WATCH | Actor Salman Khan attends the oath ceremony of the Maharashtra government at Azad Maidan in Mumbai

(Video source: ANI/ DG-IPR) pic.twitter.com/Pf58D9QCfZ

— ANI (@ANI) December 5, 2024

सलमान खान, शाहरुख खान आणि संजय दत्त, रणवीर सिंह आल्यानंतर आझाद मैदानावर स्टार्सचा जल्लोष पाहायला मिळत आहे. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरही त्याच्या कुटुंबासह दाखल झाला आहे. नितीश कुमार आणि योगी आदित्यनाथ यांच्याबरोबर अनेक मुख्यमंत्रीही पोहोचले. राम नाईक, नारायण राणे हेही उपस्थित होते. अनंत अंबानी, दीपक पारीख आणि बिर्ला कुटुंबीयही आले.

#WATCH | Mumbai | Actor Ranveer Singh attends the oath ceremony of the Maharashtra government

(Video source: ANI/ DG-IPR) pic.twitter.com/4nN6KDeFNn

— ANI (@ANI) December 5, 2024

आणखी वाचा – बाबा सिद्दीकीआधी सलमान खानला मारायचं होतं पण…; शूटरने स्वत:च केला खुलासा, सांगितला संपूर्ण प्लॅन

आझाद मैदानावर होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात मराठी संगीतकार अजय-अतुल यांचे कार्यक्रमही आयोजित केले जात आहेत. पाहुणे येताच लोक संगीतावर नाचत आहेत. अनेक जिल्ह्यांतून महिलांचे गटही कार्यक्रमाला पोहोचले आहेत. संबंध कार्यक्रमाला या कलाकार मंडळींच्या उपस्थितीने चारचाँद लागले आहेत. बरेचदा ही कलाकार मंडळी सरकारच्या अनेक धोरणांना पाठींबा देताना दिसतात. इतकंच नव्हे तर नागरिकांच्या हितासाठी सरकारकडून केल्या जाणाऱ्या जाहिराताईंमध्येही ही कलाकार मंडळी सहभाग दर्शवतात.

Tags: bollywood actorsbollywood celebrityCelebrities in Oath Taking Ceremony
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Next Post
Tharla Tar Mag Serial Update

Tharla Tar Mag : वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला सायली चक्कर येऊन पडली अन्…; अर्जुनसह सुभेदार कुटुंब काळजीत, प्रोमो समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.