सोशल मीडियाच्या या काळात कोणतीही व्यक्ती कधीही व्हायरल होऊ शकते. अशीच एक व्हायरल झालेली महाकुंभमधील सावळ्या रंगाची, सुंदर डोळ्यांची मुलगी म्हणजे मोनालीसा. सध्या महाकुंभ २०२५ची व्हायरल गर्ल मोनालिसा सोशल मीडियावर अधिराज्य गाजवत आहे. तिचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मनमोहक हास्यामुळे व्हायरल झालेली मोनालिसा आता तिच्या घरी म्हणजेच मध्य प्रदेशातील महेश्वरला परतली आहे. ती संपूर्ण महाकुंभ दरम्यान प्रयागराजमध्ये राहून रुद्राक्ष जपमाळ विकणार होती पण १५ दिवसांतच तिला महाकुंभ सोडावा लागला. अशातच तिच्याबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे ती लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. (Mahakumbh 2025 viral girl Monalisa movie)
दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी त्यांच्या ‘द डायरी ऑफ मणिपूर’ या चित्रपटात मोनालिसाला घेतलं आहे. सनोज मिश्रा मोनालिसाच्या गावी गेले होते, जिथे मोनालिसाने त्यांची भेट घेऊन चित्रपट साइन केला. ‘द डायरी ऑफ मणिपूर’ या चित्रपटात मोनालिसा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाच्या शूटिंगपूर्वी तिला मुंबईत अभिनयाचे प्रशिक्षणही दिले जाणार आहे. महाकुंभमध्ये इंटरनेटवर व्हायरल झाल्यानंतर मोनालिसाच्या सौंदर्याने आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वाने अनेक लोकांचे लक्ष वेधून घेतले. त्यामुळे सोनज मिश्रा यांनी मोनालिसाला चित्रपटात घेण्याचा निर्णय घेतला.

आणखी वाचा – रेश्माबरोबरचा गैरमसज दूर होताच केवडा आभ्याच्या घरी जाणार, नात्यामध्ये नवं वळण
दिग्दर्शक सनोज मिश्रा यांच्या ‘द डायरी ऑफ मणिपूर’ या चित्रपटातून बॉलिवूड स्टार राजकुमार रावचा मोठा भाऊ अमित रावही बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्यामुळे मोनालिसा ‘द डायरी ऑफ मणिपूर’ या चित्रपटातून राजकुमार रावचा मोठा भाऊ अमित रावबरोबर काम करणार आहे. त्यामुळे राजकुमार रावच्या भावासह मोनालिसाला चित्रपटात मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक असतील ही नक्की.
आणखी वाचा – हल्ल्यानंतर करीना-सैफने मुलांच्या सुरक्षेसाठी उचललं मोठं पाऊल, पापाराझी अन् मीडियाला केली ‘ही’ विनंती
दरम्यान, सनोज मिश्रा समाजातील ज्वलंत प्रश्नांवर चित्रपट बनवण्यासाठी ओळखले जातात. त्यांचा ‘काशी टू काश्मीर’ चित्रपट असो किंवा ‘द डायरी ऑफ वेस्ट बंगाल’, त्यांच्या चित्रपटाला खूप विरोध झाला होता. त्याला जीवे मारण्याच्या धमक्याही आल्या होत्या. पण त्याची पर्वा न करता सनोज मिश्राने हा चित्रपट प्रदर्शित केला आणि लोकांना तो खूप आवडला.