गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियासह सर्वच माध्यमांमध्ये सैफ अली खानवरील हल्ल्याचा मुद्दा गाजत आहे. त्याच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराला अटक झाली असून पुढील चौकशी सुरु आहे. तसंच सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांकडून अधिक दक्षता घेतली जात आहे. अशातच आता सैफ अली खानच्या घराबाहेर पापाराझींना सैफ-करीना सह त्यांच्या लहान जेह व तैमुर यांचे फोटो घेण्यास मनाई केली आहे. पापाराझी अनेकदा सैफ अली खान आणि करीना कपूरची मुले तैमूर आणि जेह यांची छायाचित्रे आणि व्हिडिओ क्लिक करण्यासाठी त्यांच्या घराबाहेर उभे असतात. पण आता चाहत्यांना तैमूर आणि जेहचे फोटो बघायला मिळणार नाहीत. (Kareena and Saif banned paparazzi)
याआधी सैफ आणि करिना यांनी पापाराझींना त्यांच्या मुलांचे फोटो काढण्यास कधीही नकार दिला नाही. मात्र सैफवर झालेल्या हल्ल्यानंतर या जोडप्याने आता सुरक्षेबाबत कडक पावले उचलली आहेत. सैफ आणि करिनाच्या टीमने पापाराझींना आवाहन केले आहे की त्यांनी आता पूर्वीप्रमाणे रात्रंदिवस घराबाहेर उभे राहून तैमूर आणि जेहचे फोटो काढण्याचा आणि व्हिडीओ काढण्याचे प्रयत्न करु नये. सैफ-करिनाच्या टीमने २८ जानेवारीच्या संध्याकाळी पापाराझींना एक निवेदन दिले.
आणखी वाचा – “त्याने शिवीगाळ केली आणि…”, मराठी अभिनेत्रींनी Uber चालकाला शिकवला धडा, मोठं भांडण झालं अन्…
या निवेदनातून पापाराझी आणि मीडियाला विनंती करण्यात आली होती की, अलीकडील प्राणघातक हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी यापुढे सैफ, करीना, तैमूर आणि जेह यांचे फोटो क्लिक करण्यासाठी घराबाहेर उभे राहू नये असे सांगण्यात आले. यापुढे असंही म्हटलं होतं की, सैफ आणि करिनासाठी तैमूर आणि जेहची सुरक्षा सर्वात आधी आहे. या जोडप्याच्या टीमने म्हटले आहे की, जेव्हा जेव्हा सैफ आणि करिनाच्या फोटोची संधी असेल तेव्हा पापाराझींना त्याबद्दल माहिती दिली जाईल, परंतु तरीही तैमूर आणि जेहचे फोटो कॅमेऱ्यात कैद केले जाऊ नयेत. याशिवाय सैफ अली खानने आपल्या सतगुरु शरण अपार्टमेंटमध्येही सुरक्षा वाढवली आहे.
आणखी वाचा – रेश्माबरोबरचा गैरमसज दूर होताच केवडा आभ्याच्या घरी जाणार, नात्यामध्ये नवं वळण
दरम्यान, १६ जानेवारीला सकाळी सैफ अली खानवर अनेक वेळा हल्ला करण्यात आला. लीलावती रुग्णालयाच्या वैद्यकीय अहवालात सैफला पाच ठिकाणी दुखापत झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे. यामध्ये त्याची पाठ, मनगट, मान, खांदे आणि कोपर यांचा समावेश आहे. यानंतर शस्त्रक्रिया करुन त्याला २१ जानेवारी रोजी डिस्चार्ज मिळाला. सैफची प्रकृती आता स्थिर असली तरी अभिनेत्याला महिना आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.