गेल्या काही दिवसांपासून अभिनेता धनुष व अभिनेत्री नयनतारा यांच्यात वादाची जोरदार चर्चा सुरु आहे. धनुषने दावा केला होता की, त्याच्या चित्रपटातील ३ सेकंदाची क्लिप नयनताराच्या माहितीपटात परवानगीशिवाय वापरली गेली होती. धनुषने नोव्हेंबर २०२४ मध्ये नयनतारा, तिचा पती विघ्नेश शिवन आणि त्यांचे प्रोडक्शन हाऊस राउडी पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या विरोधात मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणी आता मद्रास उच्च न्यायालयाने धनुषच्या बाजूने निकाल दिला आहे. धनुष आणि नयनतारा यांच्यातील कॉपीराइट केस धनुषने जिंकली आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सने दाखल केलेली याचिका मद्रास उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळली. (Dhanush and Nayantara controvercy)
धनुषने नेटफ्लिक्स डॉक्युमेंटरी ‘नयनताराः बियॉन्ड द फेयरी टेल’मध्ये नयनतारा आणि इतरांनी आपली परवानगी न घेता ‘नानुम राउडी धान’ चित्रपटातील फुटेज वापरल्याचे म्हटले होते. धनुषने नोव्हेंबर २०२४मध्ये नयनतारा, तिचा पती विघ्नेश शिवन आणि त्यांचे प्रोडक्शन हाऊस राउडी पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या विरोधात मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली होती. धनुषने नेटफ्लिक्स डॉक्युमेंटरी ‘नयनताराः बियॉन्ड द फेयरी टेल’मध्ये नयनतारा आणि इतरांनी आपली परवानगी न घेता ‘नानुम राउडी धान’ चित्रपटातील फुटेज वापरल्याचे म्हटले होते.
या क्लिपचा वापर झाल्याचे कळताच धनुषने त्यावेळी नेटफ्लिक्सला इशारा दिला होता की, नयनताराच्या डॉक्युमेंट्रीमधून ‘नानुम राउडी धान’ची ३ सेकंदाची क्लिप २४ तासांच्या आत हटवली नाही तर कायदेशीर लढाईलढू. तर, न्यायमूर्तीनी गेल्या आठवड्यात नेटफ्लिक्सने दाखल केलेल्या याचिकेवरील निर्णय कोणतीही तारीख न सांगता पुढे ढकलला होता. या प्रकरणी सुनावणी करताना न्यायाधीश अब्दुल कुद्दूस यांनी निर्णय दिला की, डॉक्युमेंटरी रिलीज करण्याचा करार करणाऱ्या नेटफ्लिक्सला कॉपीराइटवर दावा ठोकण्याचा कोणताही अधिकार नाही.
आणखी वाचा – धनुष व नयनतारा यांच्यातील वाद विकोपाला, एकमेकांचं तोंडही बघेना, एकाच कार्यक्रमात पोहोचले पण…
वास्तविक, नयनताराने धनुषकडे तिच्या ‘ननम राउडी धन’ या चित्रपटातील गाणी व दृश्ये तिच्या ‘नयनतारा: बियॉन्ड द फेयरी टेल’ या माहितीपटासाठी वापरण्याची परवानगी मागितली होती. मात्र धनुषने नकार दिला. पण नयनताराच्या डॉक्युमेंटरीमध्ये धनुषच्या चित्रपटातील तीन सेकंदांचे व्हिज्युअल वापरले गेले. यानंतर धनुषने नयनतारावर कॉपीराइटचा आरोप करत १० कोटी रुपयांची कायदेशीर नोटीस पाठवली होती. मात्र आता हा खटला धनुषने जिंकला आहे