मागील काही वर्षांपासून अनेक दिगदर्शकांचा ऐतिहासिक चित्रपट विषयांकडे कल वाढताना दिसत आहे. पावनखिंड, शेर शिवराज, शिवप्रताप गरुड झेप, सरसेनापती हंबीरराव असे अनेक ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आले आणि प्रचंड पसंतीस देखील पडले. या यादीत अजून एका ऐतिहासिक चित्रपटाची भर पडली आहे. तो चित्रपट म्हणजे प्रसिद्ध दिगदर्शक महेश मांजरेकर दिगदर्शित ‘वेदात मराठी वीर दौडले सात’ या चित्रपटाची घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली. (Madhuri pawar)
या चित्रपटामध्ये बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार चित्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार असल्याचे समोर आल्या नंतर आता हळू हळू आणखी कोणते कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत याची माहिती समोर आली आहे. अजून एका अभिनेत्री ने पोस्ट करत या बाबतीत माहिती दिली आहे.
आपल्या दिलखेचक अदांनी महाराष्ट्राला वेडं लावणारी महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री, नृत्यांगना माधुरी पवार ही तिच्या अदांनी चाहत्यांना भुरळ घालते. माधुरीने कोणत्याही एका प्रकारच्या भूमिकेत मर्यादित न राहता ती अनेक धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत.आता देखील माधुरी एका ऐतिहासिक भूमिकेत झळकणार आहे.(Madhuri pawar)

महेश मांजरेकर दिगदर्शित यांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटात ती महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने माधुरीने एक खास पारंपारिक फोटोशूट केलं. या फोटोंमध्ये तिने गुलाबी रंगाची नऊवारी साडी आणि त्यावर शोभेल असे दागिने परिधान केले. यात तिचा मराठमोळी अंदाज पाहायला मिळतो.
====
हे देखील वाचा – ‘या’ OTT प्लॅटफॉर्म वर पाहाता येणार थ्रिलरकॉम ‘वाळवी’
====
भूमिकेबद्दल काय म्हणाली माधुरी?(Madhuri pawar)
या चित्रपटाबाबत माधुरी सांगते की, ‘दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळणं, ही मोठी गोष्ट आहे. मी संधीचं सोनं करेन. ते सकारात्मकता देणारे दिग्दर्शक आहेत. त्यांच्याबरोबर काम करताना भारी वाटलं. एक कलाकार म्हणून त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळालं. वेडात मराठे वीर दौडले सात’ यात मी थोडी भावूक करणारी भूमिका साकारली आहे. ती साकारणं आव्हानात्मक होतं. एका दृश्याचं चित्रीकरण झाल्यानंतर मला महेश सरांकडून शाबासकी मिळाली, तो क्षण अविस्मरणीय होता’. असंही माधुरीनंं सांगितलं.
हे अन्य कलाकार साकारणार या भूमिका
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती कुडतोजी उर्फ प्रतापराव गुजर आणि त्यांचे सहा मावळे यांच्या बहलोल खानासोबतच्या लढाईतील पराक्रमावर आधारलेला ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ हा चित्रपट मराठी – हिंदीसह अजून ५ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार हा छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारणार असून प्रवीण तरडे, जय दुधाने, हार्दिक जोशी, उत्कर्ष शिंदे आणि अन्य कलाकार देखील महत्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.(Madhuri pawar)