काही व्यक्ती ज्या प्रमाणे नेहमी आनंद देत असतात त्याच प्रमाणे काही कार्यक्रम ही नित्यनियमांन हेच काम गेले कित्येक दिवसांपासून करत आले आहेत. काही कुटुंबांमध्ये हे कार्यक्रम पाहिल्याशिवाय जेवण जात नाही, तर काहींना मानसिक तणावणातून रिलीफ मिळावी म्हणून सुद्धा या कार्यक्रमांची मदत होते. याच कार्यक्रमांच्या यादितील एक कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्राची हास्य जत्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा घरोघरी एखादा सदस्य असावा असा राहत असलेला कार्यक्रम. कोरोना काळात घरात अडकलेल्या जनतेसाठी एका प्रकारचा बुस्टर डोस प्रमाणे हास्यजत्रेने कित्येकांच्या चेहऱ्यावर हास्य खुलवलं.(vishakha subhedar mhj)
परंतु मागील काही दिवसांपासून या कार्यक्रमातून काही प्रेक्षकांच्या काही आवडत्या कलाकारांनी काही कारणास्तव निरोप घेतला. या कलाकारांमध्ये अभिनेत्री विशाखा सुभेदार, अभिनेता ओंकार भोजने, अभिनेता पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे, अंशुमन विचारे या आणि अन्य काही कलाकारांनी हास्यजत्रेतून रजा घेतली. परंतु ना प्रेक्षकांनी ना या कार्यक्रमावरच प्रेम कमी होऊ दिल नाही या कलाकारांवरच.
====
हे देखील वाचा – ‘ख्वाब कहूं या गुलाब कहूं…’ रुपालीच्या पोस्ट वर शायराना अंदाजात कमेंट
====
सोशल मीडिया वर काही कलाकार सध्या बरेच सक्रिय असतात वेगवेगळे रील करून प्रेक्षकांना मनोरंजन करन हा या मागचा एक सुबक हेतू या कलाकारांचा असतो. यातच अभिनेत्री विशाखा सुभेदार देखील नेहमी वेगवेगळ्या प्रकारचे रील करत प्रेक्षकांचं मनोरंजन करत असते. नुकताच वेलेंटाईनडे वीक संपला असून अनेक मराठी कलाकारांनी त्यांच्या सोशल मीडिया वरून आपल्या पार्टनर साठी पोस्ट शेअर केली आहे. अशातच विनोदी अभिनेत्री विशाखा सुभेदार हिने तिच्या इंस्टाग्रामवर एक रील शेअर केलीये. या व्हिडियोमध्ये विशाखा “हम प्यार में जिते प्यार में मरते जायेंगे” या गाण्यावर लिपसिंग करते आहे. हे गाणं जरी रोमँटिक असलं तरी या व्हिडियोत विशाखाने तिचा विनोदी अंदाज दाखवला आहे.
हास्य जत्रेत परत येण्याची प्रेक्षकांची मागणी
या रील वर मजेशीर, प्रेमळ कमेंट्स सोबतच ‘Tai hasyjatara madhe part kadhi yetay, aamhi tumhala miss kartoy’, ‘u r so versatile actress. .expression queen..we wait u in MHJ…Plz cm’, विशाखा ताई तुम्ही परत हास्य जत्रेत या अशा आशयाच्या कमेंट्स प्रेक्षकांनी केल्या आहेत. चाहत्यांचा कलाकारांवरच हे प्रेमच कलाकारांना नेहमी प्रोत्सहन देत असत.(vishakha subhedar mhj)
या प्रसिद्ध कार्यक्रमातील सगळीचं पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. दिवसेंदिवस या कार्यक्रमाची लोकप्रियता वाढू लागली आहे. फक्त महाराष्ट्राचं न्हवे तर संपूर्ण जगाला यातील निखळ अभिनयाने वेड लावले आहे. समीर चौघुले, विशाखा सुभेदार, प्रसाद खांडेकर, अरुण कदम, प्रभाकर मोरे, पंढरीनाथ कांबळे अशा अनेक मात्तबरांच्या जोडीला गौरव मोरे, रोहित माने, वनिता खरात, इशा डे, शिवाली परब, पृथ्वीक प्रताप, ओंकार राऊत, दत्तू मोरे, निखिल बने, असे अनेक तरुण तरुणी यांच्या खांद्याला खांदा लावून काम लोकांचं मनोरंजन करण्याच्या या अठ्ठाहासात पूर्ण पणे उतरले.