मॉडेल असलेल्या उर्वशी रौतेलाने हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मॉडेलिंग बरोबरच तिने अभिनयामध्येही आपले नशीब आजमावले आहे. तिची सोशल मीडियावर चांगली फॅन फॉलोइंग आहे. अनेकदा ती अभिनय व मॉडेलिंग व्यतिरिक्त इतर काही कारणांमुळेही ती अधिक चर्चेत असते. अशातच तीचे नाव क्रिकेटर ऋषभ पंत याच्याशीही जोडले गेले. काही महिन्यांपूर्वी ऋषभचा मोठा अपघात झाला तेव्हाही उर्वशीला त्याच्याबद्दल अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. (urvashi rautela on rishabh pant)
आपल्या अभिनयाने व सौंदर्याने सतत चर्चेत राहणाऱ्या उर्वशीने नुकतेच एका माध्यमाला मुलाखत दिली आहे. ही मुलाखत सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. यामध्ये सूत्रसंचालक उर्वशीला चाहत्यांनी केलेल्या प्रतिक्रियांवर विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे विचारते. यामध्ये एक चाहता म्हणाला आहे की, “ऋषभ पंतला विसरू नका. तो तुमचा खूप आदर करतो.तो तुम्हाला खूप खुश ठेवेल”.
तसेच चाहता पुढे म्हणाला की, “ तुम्ही लग्न केलंत तर आम्हाला खूप आनंद होईल”. चाहत्यांच्या या प्रतिक्रियांवर उर्वशीने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. तिने यावर उत्तर दिले की, “मला यावर सध्या काहीच बोलायचे नाही”. तिच्या या उत्तराने चाहत्यांचा हिरमोड झाला. तसेच त्यानंतर तिला अनेक सल्लेही देऊ लागले. त्यातील एक चाहता म्हणाला की, “लवकर लग्न करा अन्यथा ऋषभ हातातून निघून जाईल”.
गेल्या कही दिवसांपासून उर्वशी व ऋषभ यांच्या अफेअरच्या चर्चा अधिक सुरु होत्या. पण या सगळ्यांवर दोघांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. सध्या उर्वशीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ती आता ‘जेएनयू’ या चित्रपटात दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. हा चित्रपट ५ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात उर्वशीबरोबर रवी किशन, ‘बिग बॉस १३’ फेम रश्मि देसाई व पीयूष मिश्रा हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.