Legendary Ghazal Singer Pankaj Udhas Died : ‘ना कजरे की धार’, ‘चिठ्ठी आयी है’, ‘चंदी जैसा रंग है तेरा’ अशा अनेक गाण्यांना आवाज देणारे गायक, पद्मश्री पुरस्कार विजेते पंकज उधास यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७२व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. पंकज यांच्या निधनाची बातमी त्यांच्या कुटुंबियांकडून अधिकृतरित्या देण्यात आली आहे. दीर्घ आजाराने त्यांचं निधन झालं असल्याचं समोर आलं आहे. त्यांची प्रकृती बऱ्याच दिवसांपासून खराब होती. दरम्यान, पंकज उधास यांच्या तब्येतीबाबत आणखी एक अपडेट समोर आली आहे.
मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, ते कर्करोगाने ग्रस्त होते. मनोरंजन विश्वातून सतत वाईट बातम्या कानावर पडत आहेत. मनोरंजन क्षेत्राने आजवर अनेक अनोखे चेहरे गमावले आहेत. अशातच आता चित्रपटांमध्ये गझल लोकप्रिय करण्यासाठी ओळखले जाणारे पंकज उधास यांच्या निधनाची दुःखद बातमी समोर आली आहे. त्यांच्या अचानक निधनाच्या समोर आलेल्या बातमीने साऱ्यांना खूप मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, चाहते व आप्तेष्टांकडून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे.
पंकज उधास यांच्या मुलीने वडिलांच्या निधनाची माहिती सोशल मीडियावर पोस्टद्वारे दिली आहे. नायब उधास हिने पोस्ट शेअर करत लिहिले आहे की, “जड अंत:करणाने मी तुम्हा सर्वांना ही दुःखद बातमी सांगत आहे की, पद्मश्री पंकज उधास आता आपल्यात नाहीत. २६ फेब्रुवारी २०२४ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला”. त्यांच्या मृत्यूची बातमी पंकज यांच्या कुटुंबीयांनी अधिकृतरीत्या दिली.
‘आज तक’ वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, पंकज उधासच्या पीआरने सांगितले की, २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता पद्मश्री पंकज उधास यांचा मृत्यू झाला. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. उपचारदरम्यानच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांची प्रकृती बऱ्याच दिवसांपासून ठीक नव्हती. पंकज उधास १९८० साली ‘आहट’ या गझल अल्बमने प्रसिद्धीझोतात आले. हिंदी चित्रपट व भारतीय पॉप संगीतातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी ते ओळखले जातात. २००६मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.