शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“चित्रपट खूप वाईट”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याचं ‘नवरा माझा नवसाचा २’बाबत भाष्य, म्हणाला, “उगाच कौतुक का करु?”

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 24, 2024 | 3:57 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Laxmichya Paulanni serial fame marathi actor Dhruva Datar called Navra Maza Navsacha 2 is bad movie.

‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिका फेम ध्रुव दातारने ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटाला म्हटलं वाईट चित्रपट, व्हिडीओही केला शेअर

Navra Maza Navsacha 2 : मराठी चित्रपटसृष्टीमधील हिट चित्रपटांच्या यादीमधील एक चित्रपट म्हणजे ‘नवरा माझा नवसाचा.’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. चित्रपटातील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. आता तब्बल २० वर्षांनंतर या चित्रपटाचा पुढचा भाग म्हणजेच ‘नवरा माझा नवसाचा २’ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दमदार स्टारकास्ट, पुरेपूर मनोरंजन करणाऱ्या ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटाला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला आहे. ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटाला पहिल्या दिवशी मिळालेला प्रतिसाद हा मराठी चित्रपटांच्या इतिहासातील सर्वांत मोठ्या ओपनिंग्जपैकी आहे. १००० पेक्षा अधिक शोजने सुरुवात केलेल्या या चित्रपटाला ६०० पेक्षाही अधिक शोज हाऊसफुल्ल होते.  (Dhruva Datar on Navra Maza Navsacha 2)

महाराष्ट्र भूषण व ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर, स्वप्नील जोशी अशा दिग्गज कलाकारांची मांदियाळी असलेला ‘नवरा माझा नवसाचा २’ २० सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला होता. चित्रपटाने पहिल्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी १.८६ कोटी रुपयांची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी चित्रपटाच्या कमाईत वाढ झाली, चित्रपटाने २.४३ कोटी रुपयांचे कलेक्शन केले. त्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी ‘नवरा माझा नवसाचा २’ ने ३.५५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. बॉक्स ऑफिसच्या आकड्यांनुसार हा चित्रपट तुफान चालत असल्याचे वाटत असलं तरी काही प्रेक्षकांनी त्यांना हा चित्रपट आवडला नसल्याचे म्हटलं आहे.

आणखी वाचा – Tula Shikvin Changlach Dhada मध्ये मोठा ट्विस्ट, भुवनेश्वरीची घरात एन्ट्री, अधिपतीने धरले पाय

‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटाबद्दल सोशल मीडियावर संमिश्र प्रतिसाद व्यक्त होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच एका मराठी अभिनेत्यानेही त्याला हा चित्रपट आवडला नसल्याचे म्हटलं आहे आणि हा अभिनेता म्हणजे ध्रुव दातार. सध्या तो ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेत राहुल चांदेकर ही भूमिका साकारत आहे. अभिनेत्याने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर “खूप वाईट चित्रपट” असं म्हटलं आहे. याशिवाय त्याने आणखी एक व्हिडीओही पोस्ट केला आहे. यामध्ये त्याने असं म्हटलं आहे की, “मी ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटाबद्दल ‘खूप वाईट चित्रपट आहे’ अशी जी स्टोरी टाकली. त्यावर मला लोकांच्या खूप कमेंट्स येत आहेत. मला खूप लोकांचे मॅसेज येत आहेत की तू एक मराठी कलाकार आहेस आणि तू असं नाही बोलायला पाहिजे. अरे पण मी असं का नाही बोलायला पाहिजे?”

View this post on Instagram

A post shared by Marathi Celeb's Katta (@marathicelebkatta)

आणखी वाचा – प्रेक्षकांना आनंद पण सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला अरबाज पटेल घराबाहेर पडल्याचं पटेना, म्हणाली, “मजा गेली आणि…”

यापुढे त्याने असं म्हटलं आहे की, “मी माझं मत मांडत आहे की, मला हा चित्रपट अजिबात आवडला नाही आणि जे चांगलं आहे त्याचं मी कौतुकच करत आहे. तो चित्रपट तितका छान असता तर त्याचे मी कौतुक केलंच असतं. पण तो चित्रपट खरच खूप वाईट आहे आणि मी मराठी कलाकार आहे म्हणून मी उगाच कौतुक करु का? माफ करा पण मी असं नाही करु शकत”. ‘नवरा माझा नवसाचा २’ मधील कलाकार या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. सुश्रिया चित्र या निर्मिती संस्थेची निर्मिती असलेल्या ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटाची निर्मिती, कथा-पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगांवकर यांनी केले आहे.  

Tags: Dhruva Datar on Navra Maza Navsacha 2Dhruva Datar on Navra Maza Navsacha 2 Marathi Moviemarathi entertainment news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Suraj Chavan Outfit

"त्यालाच सगळे कपडे देणार", सूरजचे कपडे डिझाइन करणाऱ्या व्यक्तीचा दिलदारपणा, म्हणाली, "त्याची स्टाइल लक्षात घेऊन…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.