Tula Shikvin Changlach Dhada : ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेमध्ये गेले काही दिवस नवनवीन ट्विस्ट येतं आहेत आणि हे नवीन ट्विस्ट प्रेक्षकांनाही आवडत आहेत. मालिकेत घडणाऱ्या घडामोडी आणि मालिकेत येणारे नवनवीन ट्वीस्ट हे प्रेक्षकांना कथानकाशी नेहमीच खिळवून ठेवतात. त्यामुळे आगामी कथानकाविषयी प्रेक्षकांना कायमच उत्सुकता लागून राहिलेली असते. मालिकेत काही दिवसांपूर्वी अक्षरा व अधिपती यांच्या आयुष्यात चारुलताची एन्ट्री झालेली पाहायला मिळाली. चारुलताने घरात एन्ट्री केल्यानंतर अक्षरा व चारुहास यांनी तिला स्वीकारलं आहे. पण अधिपती चारुलताचे आई म्हणून स्वीकार करण्यास अजूनही तयार नाही. (Tula Shikvin Changlach Dhada New Promo)
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत चारुलता एकीकडे अधिपतीविषयी काळजी व प्रेम व्यक्त करत आहे. पण दुसरीकडे अधिपती तिला काही केल्या आई म्हणून स्वीकारण्यास तयार नाही असं दिसून येत आहे. नुकत्याच झालेल्या भागात चारुलताने अधिपतीकडे तिची काळजी व्यक्त करत असं म्हटलं की, “अधिपती तूला काही झालं असतं तर आमचं काय झालं असतं? तुझ्या मागे संकटांची माळ मागे लागली आहे. आई म्हणून तुझ्याविषयी काळजी वाटते”, तेव्हा अधिपती तिला उत्तर देत असं म्हणतो की, “तुम्ही मला जन्म दिला असला तरी आणि तुम्ही कितीही उपकार केले असले तरी माझ्या मनात तुमच्याविषयी आदर नाही”.
यापुढे तो असं म्हणतो की, “आई म्हणून बोलण्याचा अधिकार मी फक्त माझी आईसाहेबांना दिला आहे. आमची काळजी करु नका. माझ्याशी बोलू नका, माझी तुमच्याशी बोलण्याची इच्छा नसते”. यावर अधिपतीला अक्षरा आणि चारुहास समजवतातही. अशातच आता या मालिकेचा एक नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ज्यामध्ये भुवनेश्वरी पुन्हा एकदा आल्याचे पाहायला मिळत आहे आणि भुवनेश्वरीला पुन्हा आल्याचे पाहून अधिपतीला खूपच आनंद झाला आहे.
या नवीन प्रोमोमध्ये दरवाज्यातून कुणी तरी आत येत असल्याचे दिसते. यावर अक्षरा अधिपतीला अपण दरवाजा बंद केला होता ना? असं म्हणते. मग आरशात भुवनेश्वरी दिसते, आईला पुन्हा आलेले पाहून अधिपती भावुक होतो आणि माझ्या आईसाहेब परत आल्या असं म्हणतो. तसंच यासाठे तो गणपती बाप्पाचे आभारही मानतो. दरम्यान, हा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला असून या नवीन प्रोमोमधून भुवनेश्वरी पुन्हा आल्याने आधिपतीला जसा आनंद झाला आहे तसंच अनेक प्रेक्षकांनाही आनंद झाल्याचे पाहायला मिळत आहे.