शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लग्नाला कुटुंबियांचा विरोध, पत्नीचा धर्म वेगळा अन्…; फिल्मी स्टाइल होती पंकज उधास यांची लव्हस्टोरी, लग्न करुनही…

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 26, 2024 | 5:42 pm
in Trending
Reading Time: 2 mins read
google-news
Late gazal singer Pankaj udhas lovestory with farida see the details

लग्नाला कुटुंबियांचा विरोध, पत्नीचा धर्म वेगळा अन्...; फिल्मी स्टाइल होती पंकज उधास यांची लव्हस्टोरी, लग्न करुनही...

हिंदी मनोरंजन सृष्टीमधून नुकतीच एक दु:खद बातमी समोर येत आहे. गेली अनेक वर्ष आपल्या सुमधूर आवाजाने प्रेक्षकांच्या मनात घर करणारे ज्येष्ठ गझल गायक पंकज उधास यांचे निधन झाले आहे.  वयाच्या ७२व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पंकज उधास यांच्या निधनाच्या वृत्ताने संपूर्ण कलाविश्वाला दु:खद धक्का बसला आहे. लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सर्वचजण पंकज उधास यांच्या गझलांचे चाहते आहेत.

पंकज उधास यांच्या गझलां इतकीच त्यांची प्रेमकहाणीदेखील रंजक आहे. पंकज उधास यांनी आंतरधर्मीय विवाह केला असून त्यांच्या प्रेमकथेत त्यांच्या शेजाऱ्याची महत्वाची भूमिका असल्याचे म्हटले जाते. पंकज उधास यांच्या शेजाऱ्यानेच पंकज उधास यांची पत्नी फरीदाशी पहिल्यांदा ओळख करून दिली. त्यावेळी पंकज उधास हे पदवीचे शिक्षण घेत होते. तर फरीदा या एअर हॉस्टेस होत्या.

View this post on Instagram

A post shared by Nayaab Udhas (@nayaabudhas)

एका शेजाऱ्याने घडवून आणलेल्या भेटीतून पंकज व फरीदा यांची मैत्री झाली. यानंतर दोघांमध्ये भेटीगाठी सुरू झाल्या. सतत एकमेकांबरोबर वेळ घालवल्यानंतर दोघेही एकमेकांच्या जवळ आले आणि कालांतराने एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण दोघांमध्ये धर्माचा मोठा अडसर होता. पंकज उधास हे धर्माने हिंदू होते, तर फरीदा या पारशी कुटुंबातील होत्या. दोघांच्या भिन्न धर्मामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनात अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. 

आणखी वाचा – गझल पोरकी झाली! ज्येष्ठ गायक पंकज उधास यांचे निधन, वयाच्या ७२व्या वर्षी जगाचा निरोप

पंकज व फरीदा यांच्या नात्याने पंकज यांचे कुटुंब खूश होते. पण फरीदाचे कुटुंब त्यांच्या लग्नावर नाराज होते. मात्र, दोघांच्या कुटुंबियांच्या संमतीशिवाय संसार थाटायचा नाही असं पंकज उधास यांचे म्हणणे होते. त्यामुळे दोघांनीही ठरवलं की, दोन्ही घरच्यांची सहमती असेल तेव्हाच लग्न करायचं. अशातच काही काळानंतर फरीदाच्या घरच्यांनीही दोघांच्या लग्नाला होकार दिला आणि मग दोघांनीही लग्न केले.  

आणखी वाचा – गझल गायक पंकज उधास यांचं निधन नेमकं कशामुळे झालं?, लेकीने पोस्ट शेअर करत सांगितली सत्य परिस्थिती, निधनापूर्वी काय घडलं?

पंकज उदास यांच्या निधनाचे वृत्त कळताच अनेकांनी दु:ख व्यक्त केलं आहे. तसेच मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी व दिग्गजांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. दरम्यान, पंकज उधास यांच्या पश्चात दोन मुली असून त्यांचे नाव रेवा व नायाब असं आहे.  

Tags: Famous Ghazal SingerGazal SingerPankaj UdhasPankaj Udhas DeathPankaj Udhas Death NewsPankaj Udhas Farida Love StoryPankaj Udhas Love Storyगझल गायक पंकज उधासपंकज उधास निधनपंकज उधास निधन बातमीपंकज उधास प्रेमकहाणीप्रसिद्ध गझल गायक
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Legendary Ghazal Singer Pankaj Udhas Died

Pankaj Udhas Death : "सच्चा माणूस गमावला", ज्येष्ठ गझल गायक पंकज उधास यांच्या निधनानंतर गायकांना दुःख अनावर, सोनू निगमही हळहळला, म्हणाला, "तुम्ही आता…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.