‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे दिव्या पुगावकर. या मालिकेतील आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात तिनं आपलं एक वेगळंच स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेत तिने मुक मुलीची भूमिका साकारली होती आणि तिच्या या अभिनयला सर्वांनी डोक्यावर घेतलं. नुकतीच ती झी मराठीवरील नवीन मालिका लक्ष्मी निवासमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अशातच नवीन वर्षाच्या सुरुवातीला अभिनेत्रीने चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे, ती म्हणजे तिच्या लग्नाची. अभिनेत्री लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे आणि याबद्दल तिने सोशल मीडियाद्वारे माहिती दिली आहे. (divya pugaonkar get married soon)
दिव्यामे तिच्या सोशल मीडियाद्वारे लग्नपत्रिकेची एक छोटीशी झलक शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. २०२५ या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत दिव्याने लवकरच लग्न करणार असल्याचंही जाहीर केलं आहे. “नवीन वर्ष आणि पुढे आयुष्यभराचे प्रेम. लवकरच होत आहे’ असं म्हणत तिने तिची लग्नपत्रिका शेअर केली आहे. दिव्याने शेअर केलेल्या व्हिडीओवर ‘अक्षय आणि दिव्या Save The Date’ असं कॅप्शन देण्यात आलं आहे. या पोस्टखाली तिला अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्रीने यामध्ये कुठेही तिच्या लग्नाच्या तारखेचा खुलासा केलेला नाही. त्यामुळे कमेंट्समध्ये कलाकारांसह चाहत्यांनीसुद्धा दिव्याला ‘तारीख सांग’ अशी विचारणा केली आहे.
अभिषेक रहाळकरने या पोस्टखाली “आमची उपस्थिती हाच आमचा आहेर” अशी कमेंट केली आहे. तर सिद्धार्थ खिरीडने “तारीख तर सांग” अशी कमेंट केली आहे. यावर अभिनेत्रीने त्याला “कॉल वर सांगते” असं उत्तर दिलं आहे. त्यामुळे आता अनेकांना अभिनेत्रीच्या लग्नाची उत्सुकता लागून राहिली आहे. १९ डिसेंबर २०२१ रोजी दिव्याचा तिलक समारंभ पार पडला होता. यानंतर तिला अनेकदा लग्नाबद्दल विचारणा केली जायची. अशातच आता तिने लग्नाची माहिती दिली आहे. तिने तारीख जाहीर केली नसली तरी लवकरच ती लग्नबंधनात अडकणार आहे असं वाटत आहे.
आणखी वाचा – सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा ‘कार’नामा, नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी घेतली महागडी आलिशान कार, फोटो व्हायरल
दरम्यान, दिव्याच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव अक्षय घरत असं आहे. अक्षय घरत फिटनेस मॉडेल म्हणून ओळखला जातो. त्याच्या इन्स्टाग्राम बायोमध्ये न्यूट्रिशनिस्ट, प्रोफेशनल फिटनेस ट्रेनर तसेच उद्योजक असं नमूद केलेलं आहे. तर दिव्याने मुलगी झाली हो मन धागा धागा जोडते नवा या मालिकांत काम केलं आहे. तर आता ती लक्ष्मी निवासमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेत ती श्रीनिवास आणि लक्ष्मी यांच्या धाकट्या मुलीची व्यक्तिरेखा अभिनेत्री साकारत आहे.