Siddharth Chandekar And Mitali Mayekar : सध्या सर्वत्र मराठमोळ्या चित्रपटांची चलती सुरु असलेली पाहायला मिळत आहे. एकामागोमाग एक मराठी चित्रपट चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालण्यास सज्ज असलेले पाहायला मिळत आहेत. अशातच लवकरच एक मराठमोळा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आणि चित्रपट प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाने सर्वत्र हवा केलेली पाहायला मिळत आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘फसक्लास दाभाडे!’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षकांना दाभाडे कुटुंबीयांची कथा या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. सर्वत्र चित्रपटाची चर्चा सुरु असताना या चित्रपटातील गाण्यांनी धुमाकूळ घातला आहे. याशिवाय चित्रपटाच्या टीझरने चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढवली आहे.
हेमंत ढोमे लिखित, दिग्दर्शित या चित्रपटात क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ, निवेदिता सराफ, हरिष दुधाडे, राजन भिसे, राजसी भावे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अशातच आता या चित्रपटात आणखी एका कलाकाराची एंट्री असल्याचं समोर आलं आहे. चित्रपटाच्या दिस सरले या गाण्यातून या अभिनेत्रीची एंट्री पाहायला मिळत आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री मिताली मयेकर आहे. मिताली मयेकरच्या चित्रपटातील एन्ट्रीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
आणखी वाचा – Ileana DCruz Pregnancy : इलियाना डिक्रूझ दुसऱ्यांदा होणार आई?, अभिनेत्रीच्या ‘त्या’ फोटोने चर्चांना उधाण

काल सिद्धार्थ चांदेकर व मिताली मयेकरने लवकरच गुडन्यूज देणार असल्याचं सांगितलं होतं. तेव्हापासून ही जोडी कोणती खुशखबर देणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या होत्या. अशातच सिद्धार्थ व मिताली पहिल्यांदाच एका चित्रपटातून एकत्र काम करताना समोर आले आहेत. यापूर्वी दोघांनी कधीही मोठ्या पडद्यावर एकत्र काम केले नव्हते. या चित्रपटात ही जोडी एकत्र पाहायला मिळणार असल्याने चाहत्यांचा आनंदही गगनात मावेनासा झाला आहे.
आणखी वाचा – ‘लक्ष्मी निवास’ फेम अभिनेत्री लवकरच विवाहबंधनात अडकणार, सोशल मीडियावर शेअर केली लग्नपत्रिका, कधी करणार लग्न?
“पहिला सिनेमा एकत्र! फसक्लास पैकी!”, असं कॅप्शन देत सिद्धार्थ व मितालीने आनंदाची बातमी दिली आहे. खुळ्या भावंडांची ही इरसाल स्टोरी प्रेक्षकांना २४ जानेवारीपासून मोठ्या पडद्यावर पाहाता येणार आहे. टी-सीरीज, कलर येल्लो प्रॉडक्शन आणि चलचित्र मंडळी निर्मित ‘फसक्लास दाभाडे’चे भूषण कुमार, कृष्ण कुमार, आनंद एल राय आणि क्षिती जोग निर्माते आहेत. ‘झिम्मा’च्या यशानंतर प्रेक्षकही या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.