Meghan Jadhav And Anushka Pimputkar Realtionship : ‘झी मराठी’वरील ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेतील लोकप्रिय अभिनेता मेघन जाधव पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मालिकेत मेघनच्या जयंत या भूमिकेने नेहमीच लक्ष वेधलं. आपल्या दमदार अभिनयासह साधेपणा आणि निरागस स्माईल असलेला अभिनेता मेघन जाधवने यावेळी मात्र आपल्या रिअल लाईफमधून एक हॅप्पी ट्विस्ट आणला आहे. सोशल मीडियावर नेहमीच ऍक्टिव्ह राहणारा मेघन आपल्या चाहत्यांसह वेळोवेळी खास क्षण शेअर करताना दिसतो. पण यावेळी त्याने अचानक शेअर केलेल्या पोस्टने मात्र सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं आहे.
अभिनेत्याने आपल्या इंस्टाग्रामवर अकाउंटवर एक उत्सुकता वाढवणारी पण खूपच रोमँटिक अशी स्टोरी शेअर केली. या स्टोरीमध्ये मेघनने आपल्या हातात एका मुलीचा हात घेऊन रिंग दाखवत असल्याचा फोटो शेअर केला. त्याचसह या स्टोरीवर मेघनने रोमँटिक बॉलिवूड गाणं ठेवलं. त्यामुळे मेघनबरोबर असलेली ही मुलगी कोण आहे हा प्रश्न साऱ्यांना पडला. ही स्टोरी पाहताच अनेक चाहत्यांच्या उत्सुकता वाढली आहे.
आणखी वाचा – ‘शिर्डी के साई बाबा’ फेम अभिनेते सुधीर दळवींची प्रकृती चिंताजनक, उपचार सुरु, कुटुंबीयांनी मागितली आर्थिक मदत
“अरे ही आहे तरी कोण?”, “मेघनची खऱ्या आयुष्यातील जान्हवी कोण असेल?”, अशा फॅन्समध्ये चर्चा रंगू लागल्या. याशिवाय मेघनची होणारी बायको ही लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील अभिनेत्री अनुष्का पिंमपुटकर असल्याचं समोर आलं आहे. कारण अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया अकॉउंटवर स्टोरी रिपोस्ट करत मेघनसहचा फोटो शेअर केला आहे. हे पाहून चाहत्याने अंदाज लावला आहे की, मेघनची होणारी बायको ही अनुष्का पिंमपुटकरच आहे.
आणखी वाचा – Paaru Serial : पारू-आदित्य वेगळे होणार, अहिल्यादेवींच्या बोलण्याने मोठा निर्णय, मालिकेत ट्विस्ट
आता मेघन आणि अनुष्का केव्हा लग्नबंधनात अडकणार? याकडे साऱ्यांचं लक्ष लावून राहील आहे. त्यांच्या लव्हस्टोरीबाबतही जाणून घ्यायला चाहते मंडळी उत्सुक आहेत.





