गुरूवार, जुलै 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘शिर्डी के साई बाबा’ फेम अभिनेते सुधीर दळवींची प्रकृती चिंताजनक, उपचार सुरु, कुटुंबीयांनी मागितली आर्थिक मदत

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 30, 2025 | 3:26 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
sudhir dalvi latest news

'शिर्डी के साई बाबा' फेम अभिनेते सुधीर दळवींची प्रकृती चिंताजनक, उपचार सुरु, कुटुंबीयांनी मागितली आर्थिक मदत

sudhir dalvi latest news : ‘शिर्डी के साई बाबा’ या टीव्ही मालिकेतील अभिनेते सुधीर दळवी सध्या रुग्णालयात दाखल आहेत. त्यांना सेप्सिस नावाच्या गंभीर आजाराने ग्रासले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु असून, त्यासाठी १०-१५ लाख रुपयांची गरज आहे. ही माहिती समोर आल्यानंतर रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा कपूर साहनी हिने मदतीचा हात पुढे केला आहे. तिने सोशल मीडियावर याबाबतची पोस्टही केली, मात्र यामुळे ती निशाण्यावर आली. पण ती गप्प बसली नाही आणि तिने सडेतोड उत्तर दिले. सुधीर दळवी यांचे वय ८६ वर्षे आहे. ते ८ ऑक्टोबर २०२५ पासून मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत.

हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर सेप्सिसवर उपचार सुरु आहेत, जो एक जीवघेणा संसर्ग आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. रिपोर्ट्सनुसार, उपचाराचा खर्च आधीच १० लाख रुपयांच्या पुढे गेला आहे आणि उपचार सुरु राहिल्यास १५ लाखांपर्यंत पोहोचू शकतो. सुधीर दळवी यांच्या कुटुंबीयांनी चाहते आणि इंडस्ट्रीकडे मदतीची विनंती केली होती. यानंतर रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा कपूर मदतीसाठी पुढे आली.

आणखी वाचा – प्रेम, आपुलकी, कुटुंबाची ओढ आणि…; ‘तू माझा किनारा’चा भावनिक प्रवास ३१ ऑक्टोबरपासून सुरु, भूषण प्रधानचा जबरदस्त अभिनय

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

याबाबत तिने एक पोस्ट शेअर केली आहे. तिने लिहिले, “झाले आहे, मी त्याला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देतो”. मात्र, एका युजरने प्रश्न केला की, “जर त्यांनी दान केले तर मग त्यांनी हे पोस्ट करुन का दिखावा केला”. एकाने लिहिले आहे, “तुम्ही मदत केली तर इथे का उल्लेख केला… फुटेज हवे आहे?”. ट्रोल झाल्यानंतर रिद्धिमाने सडेतोड उत्तर दिले आणि लिहिले, “आयुष्यातील प्रत्येक गोष्ट दिसण्याबद्दल नसते. एखाद्या गरजूला मदत करणे आणि आपण जे काही करु शकतो तो सर्वात मोठा आशीर्वाद आहे”.

Tags: sudhir dalvisudhir dalvi healthtelevision actor
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Ayesha Khan Police Custody
Entertainment

“मी एक शब्दही बोलले नाही”, आंदोलन प्रकरणात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात, म्हणाली, “घोषणाबाजी…”

जुलै 23, 2026 | 11:13 am
Salman Khan Student Protest
Entertainment

विद्यार्थ्यांच्या निषेधाच्या समर्थनार्थ सलमान खाननेही उठवला आवाज, म्हणाला, “राजकीय रंग…”

जुलै 23, 2026 | 10:36 am
Shabana Azmi asthma attack
Entertainment

CJP च्या निषेधादरम्यान 75 वर्षीय अभिनेत्रीला दम्याचा झटका, अश्रुधुराच्या धुरामुळे तब्येत बिघडली आणि…

जुलै 22, 2026 | 11:42 am
Next Post
paaru marathi serial

Paaru Serial : पारू-आदित्य वेगळे होणार, अहिल्यादेवींच्या बोलण्याने मोठा निर्णय, मालिकेत ट्विस्ट

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.