गुरूवार, जुलै 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Paaru Serial : पारू-आदित्य वेगळे होणार, अहिल्यादेवींच्या बोलण्याने मोठा निर्णय, मालिकेत ट्विस्ट

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 30, 2025 | 5:03 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
paaru marathi serial

Paaru Serial : पारू-आदित्य वेगळे होणार, अहिल्यादेवींच्या बोलण्याने मोठा निर्णय, मालिकेत ट्विस्ट

paaru marathi serial : ‘झी मराठी’ वाहिनीवरील मालिका नेहमीच प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन करतात. त्यातही ‘पारू’ या मालिकेने प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधलं आहे. सध्या या मालिकेत एक अतिशय महत्त्वाचं आणि भावनिक वळण आल्याचं पाहायला मिळत आहे. ‘झी मराठी’ वाहिनीने नुकताच या मालिकेचा नवीन प्रोमो शेअर केला आहे. यांत आदित्य आणि पारू किर्लोस्कर मेन्शनमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहेत. आदित्य-पारू आल्यापासून अहिल्यादेवी मात्र नाराज असतात. आणि ते आदित्य-पारूला बघून घेत नाहीत. यादरम्यान त्रागा केल्याने अहिल्यादेवी आजारी पडतात.

समोर आलेल्या प्रोमोमध्ये आदित्यची आई अहिल्यादेवी गंभीर आजारी असल्याचं दिसत आहे . हे पाहून पारू घाबरते आणि अहिल्यादेवींची काळजी घेताना दिसते. आधीपासूनच पारूला अहिल्यादेवींची काळजी वाटत असते. अहिल्यादेवींच्या नखालाही धक्का लागता कामा नये यासाठी पारूने विशेष काळजी घेतलेली असते. मात्र यावेळी पारूवरील राग अहिल्यादेवींच्या मनात असतो. आणि रागाच्या भरात अहिल्यादेवी पारूची मदत नाकारतात आणि म्हणतात “माझं जर काही झालं, तर तुला विरोध करायला कोणी राहणार नाही…!”.

आणखी वाचा – ‘शिर्डी के साई बाबा’ फेम अभिनेते सुधीर दळवींची प्रकृती चिंताजनक, उपचार सुरु, कुटुंबीयांनी मागितली आर्थिक मदत

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

अहिल्यादेवींचे हे वाक्य ऐकून पारू भावुक होत म्हणते “असं काही बोलू नका… तुम्हाला काही होणार नाही…”. त्यावर अहिल्यादेवी तिला कठोर शब्दांत सांगतात “तू एका आईला तिच्या मुलापासून दूर केलंस… त्याचं पाप तुला नक्की लागेल”. हे ऐकताच पारू मोठा निर्णय घेते आणि म्हणते “जर असं असेल तर मी आदित्य सरांच्या आयुष्यातून निघून जाईन. तुमचा मुलगा म्हणून आदित्य सर नेहमी तुमच्यासोबत राहतील.. हे माझं वचन आहे”.

आणखी वाचा – प्रेम, आपुलकी, कुटुंबाची ओढ आणि…; ‘तू माझा किनारा’चा भावनिक प्रवास ३१ ऑक्टोबरपासून सुरु, भूषण प्रधानचा जबरदस्त अभिनय

असं म्हणून पारू तिथून बाहेर पडते. अहिल्यादेवींच्या बोलण्याने पारूने घेतलेला हा मोठा निर्णय आता आदित्य-पारूला वेगळं करणार का?, हा प्रश्न साऱ्यांना सतावत आहे. पारू आदित्यच्या आयुष्यातून दूर जाण्याचा निर्णय घेताना दिसल्याने खरंच ती आदित्यच्या आयुष्यातून निघून जाणार का?, हे पाहणं रंजक ठरेल.

Tags: marathi serialpaaru marathi serialpaaru serial
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Ayesha Khan Police Custody
Entertainment

“मी एक शब्दही बोलले नाही”, आंदोलन प्रकरणात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात, म्हणाली, “घोषणाबाजी…”

जुलै 23, 2026 | 11:13 am
Salman Khan Student Protest
Entertainment

विद्यार्थ्यांच्या निषेधाच्या समर्थनार्थ सलमान खाननेही उठवला आवाज, म्हणाला, “राजकीय रंग…”

जुलै 23, 2026 | 10:36 am
Shabana Azmi asthma attack
Entertainment

CJP च्या निषेधादरम्यान 75 वर्षीय अभिनेत्रीला दम्याचा झटका, अश्रुधुराच्या धुरामुळे तब्येत बिघडली आणि…

जुलै 22, 2026 | 11:42 am
Next Post
Meghan Jadhav And Anushka Pimputkar Realtionship

'लक्ष्मी निवास' फेम मेघन जाधव लवकरच अडकणार लग्नबंधनात, दिली प्रेमाची कबुली, होणारी पत्नीही आहे अभिनेत्री

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.