lagnanantar hoilach prem sanyogeeta bhave : ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत एकामागोमाग एक ट्विस्ट येताना पाहायला मिळत आहेत. आणि त्यामुळेच ही मालिका रसिकांच्या मनात घर करुन आहे. या मालिकेमध्ये मृणाल दुसनीस, ज्ञानदा रामतीर्थकर, विवेक सांगळे आणि विजय आंदळकर या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. आणि या कलाकारांसह मालिकेतील आणखी दोन पात्रे नेहमीच चर्चेत राहिली. ही पात्र म्हणजे संयोगिता भावे आणि कश्मिरा कुलकर्णी. मालिकेतील वसू आत्या ही भूमिका संयोगिताने उत्तमरीत्या पार पाडली. त्यांची खलनायिकेची भूमिका साऱ्यांच्या पसंतीस पडली. मालिकेत नेहमीच खलनायिकेच्या भूमिकेत असणाऱ्या संयोगिताला आजारपणाशीही लढावे लागले.
‘लग्नानंतर होईलच प्रेम’ फेम अभिनेत्रीनं तिच्या आजारपणाबद्दल सांगितलं आहे. अभिनेत्रीला कॅन्सरचं निदान झालं असल्याचं समोर आलं आहे. अलीकडेच संयोगिता भावे यांनी ‘मज्जा पिंक’च्या “हिलिंग सर्कल विथ वनश्री” या सेगमेंटला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी त्यांच्या आजारपणाबाबत आणि त्यातून बरे होण्याबाबत भाष्य केलं. आजारपणाबाबत सांगताना संयोगिता म्हणाल्या, “कॅन्सरबद्दल कळताच मी थोडी हलले होते. पण, एक गोष्ट म्हणजे तेव्हा माझ्या मनामध्ये हा प्रश्न नाही आला की, हा आजार मलाच का झाला? मी काय केलं? हे माझ्या डोक्यामध्ये आलं नाही. थोडी हलले होते. लोकं म्हणतात या आजारावर काही उपचार नाहीयेत. हा झाल्यावर लोकं विचार करतात, हा आपल्यालाच का झाला? हा विचार माझ्या डोक्यात कधीच आला नाही”.
पुढे त्यांनी म्हटलं, “पण मी म्हटलं, आज यावर आपल्याकडे खूप ट्रिटमेन्ट्स आहेत. म्हणजे, मेडिकल सायन्सही आपलं खूप पुढे गेलं आहे. शिवाय या आजारावर अनेक औषधोपचार उपलब्ध आहेत. तर, आपण पडू यातून बाहेर, काय हरकत आहे? एवढाच एक विचार होता माझ्या मनात”.
आणखी वाचा – अखेर पारू-आदित्यचं अहिल्यादेवींनी केलं स्वागत, किर्लोस्कर घरात एंट्री केली अन्…; प्रोमो समोर
आजारपणातून संयोगिता बऱ्या कशा झाल्या याबद्दल सांगताना त्या म्हणाल्या, “आपण आईची प्रोसेस बघितली आहे. आईने जे केलं नाही, ते करायचं नाही असं नाही. डॉक्टर जे सांगतिल ते सगळं ऐकायचं. छोट्या-छोट्या गोष्टी मी तेव्हा करत होते. माझे सहा केमो होते, मला कधी त्रास जाणवला नाही. मी केमोच्या दरम्यान बरंच काम केलं आहे”.





