soham bandekar wedding reception : सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे ती म्हणजे बांदेकरांच्या लेकाच्या लग्नाची. लोकप्रिय भावोजी आदेश बांदेकर आणि अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांच्या लेकाचा शाही विवाहसोहळा संपन्न झाला. अभिनेता सोहम बांदेकर व अभिनेत्री पूजा बिरारी काही दिवसांपूर्वीच लग्नबंधनात अडकले. २ डिसेंबर २०२५ रोजी मोठ्या थाटामाटात विवाहसोहळा पार पडला. पूजा बिरारी आणि सोहम बांदेकरचं लग्न लोणावळ्यातील रिसॉर्टमध्ये करण्यात आलं. पूजा-सोहमच्या लग्नाचे फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. मात्र आता त्यांच्या लग्नाची पुन्हा एकदा चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. कारण पूजा बिरारी आणि सोहम बांदेकर यांचा रिसेप्शन सोहळा आज मुंबईमध्ये पार पडला. त्यांच्या या कार्यक्रमाला कलाकारांसह संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनीही हजेरी लावली.
सोहम-पूजाचा हा रिसेप्शन सोहळा सध्या साऱ्यांना थक्क करणारा आहे. राजकीय नेत्यांची उपस्थिती, कलाकार मंडळींची मांदियाळीत हा सोहळा संपन्न झाला. रिसेप्शनसाठी पूजा व सोहमच्या लूकने साऱ्यांच्या नजरा वळविल्या. पूजाने रिसेप्शनला गोल्डन कलरचा सुंदर लेहेंगा घातला होता. तर सोहम नेव्ही ब्लू रंगाच्या सूटमध्ये खूपच छान दिसत होता. या दोघांच्या लग्नाप्रमाणे रिसेप्शन पार्टीला सुद्धा मराठी कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली.
आणखी वाचा – अखेर पारू-आदित्यचं अहिल्यादेवींनी केलं स्वागत, किर्लोस्कर घरात एंट्री केली अन्…; प्रोमो समोर
एव्हरग्रीन जोडी अशोक सराफ-निवेदिता सराफ, रोहिणी हटंगडी, केदार शिंदे, नीना कुलकर्णी, श्रेयस तळपदे, क्रांती रेडकर-समीर वानखेडे, अजिंक्य देव, कविता मेढेकर, तुषार दळवी, अशोक शिंदे, निर्मिती सावंत, सोनाली खरे, सोनाली कुलकर्णी, आशय कुलकर्णी, रवी जाधव असे असंख्य सेलिब्रिटी यावेळी उपस्थित होते.
इतकंच नव्हे तर शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनीही पूजा बिरारी आणि सोहम बांदेकर यांच्या रिसेप्शनला हजेरी लावली. याशिवाय शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे त्यांची पत्नी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी देखील हजेरी लावली.





