‘चला हवा येऊ द्या’ फेम मराठी अभिनेता कुशल बद्रिके हा पडद्यावर जितका विनोदी आहे, तितकाच तो त्याच्या खऱ्या आयुष्यातदेखील गंमतीशीर आहे. त्याच्या या विनोदी स्वभावाचा प्रत्यय वेळोवेळी आलाच आहे. ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमाच्या माध्यमातून कुशल अवघ्या महाराष्ट्रात लोकप्रिय झाला. या शोमधून विनोदी स्किट्स करत त्याने चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन केले आहे. कुशल हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. सोशल मीडियावर तो त्याचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असतो. या फोटो किंवा व्हिडीओखखालील कुशलचे कॅप्शन्सही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतात. (Kushal Badrike Sunayana Photoshoot)
कुशलचा सुनयनाबरोबर प्रेमविवाह झाला असून त्यांच्यात नवरा-बायकोपेक्षा अधिक मित्र-मैत्रिणीचं नातं पाहायला मिळतं. कुशल आपल्या पत्नीबरोबरचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. अशातच त्याने पत्नीच्या एका खास फोटोशूटचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये कुशल स्वत: त्याच्या पत्नीचे फोटो काढत आहे आणि हे खास फोटो काढण्यासाठी त्याने लेकाचीही मदत घेतली आहे. सूनयनाचे खास फोटो काढण्यासाठीची कुशल व त्याच्या लेकाची मेहनत या व्हिडीओमध्ये दिसत आहे. शिवाय या फोटोशूटमागची भावना कुशलने कॅप्शनमध्ये शेअर केली आहे.
आणखी वाचा – विकी कौशलने कतरीना कैफची नाना पाटेकरांशी केली तुलना?, म्हणाला, “कंट्रोल उदय…”
कॅप्शनमध्ये कुशलने असं म्हटलं आहे की, “माणसाला आयुष्यात सुखाचा क्षण वेचता आला नाही तरी चालेल. पण बायकोने सांगितल्यावर तिचा छानसा फोटो मात्र खेचता आला पाहिजे. सुखाचा संसार हा आपल्या नशिबात असला तरी क्लिक होईलच असं नाही, ते बऱ्याचदा कॅमेऱ्यामध्ये केलेल्या क्लिकवरसुद्धा अबलंबून असतं. मला छान फोटो काढायला जमतील हा शोध माझ्या बायकोने लावला आहे. यावरुन असे सिद्ध होते की, बऱ्याचदा “भीती” सुद्धा शोधाची जननी असू शकते. आणि या निकषावर माझ्या मुलाचा संसारसुद्धा छान होईल असा फोटो माझ्या डोळ्यासमोर उभा राहत आहे”.
आणखी वाचा – अंकिता वालावलकरची लगीनघाई, लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात, पहिला फोटो समोर
दरम्यान, कुशलने शेअर केलेल्या या खास व्हिडीओला चाहत्यांसह कलाकारांनीही चांगलाच प्रतिसाद दिला आहे. अभिज्ञा भावे, सुकन्या मोने, फुलवा खामकर यांसारख्या अनेकांनी कमेंट्स करत या व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे. अभिज्ञा भावेने हसण्याच्या इमोजी पोस्ट केल्या आहेत. तर सुकन्या मोने यांनी “तुझी परी राणी तुझ्या नजरेतून आम्हाला गोड दिसली हो” अशी कमेंट केली आहे. शिवाय फुलवा खामकरांनी हार्ट इमोजी पोस्ट करत या व्हिडीओवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.