निखळ विनोद निर्माण करणाऱ्या कार्यक्रमांमध्ये अग्रेसर असलेला कार्यक्रम म्हणजे चला हवा येऊ द्या.कार्यक्रमातील कलाकार भाऊ कदम, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, अंकुर वाढवे, आणि इतर सर्वच कलाकार निखळ हास्यनिर्मिती करून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात व्यस्त असतात. येणाऱ्या प्रत्येक कलाकाराला पोट धरून हसायला लावणारे त्यांचे विनोद प्रेक्षकांच्या हि चांगल्याच पसंतीस उतरतात.(Kushal Badrike accident)
कधी कधी विनोद एवढा टोकाचा होतो कि खरंच असं घडल कि त्या विनोदाचा हा एक भाग होता हे काही क्षणा पुरत विसरलं जात. असच काहीस झालं चला हवा येऊ द्याच्या मंचावर. एका स्किट दरम्यान अभिनेता कुशल बद्रिके चालू स्किट मध्ये स्टेज वरून खाली पडला आणि उपस्थति लोकांची एकच भंबेरी उडाली.
रुपेरी पाड्यावरी सिने तारका ऋता दुर्गुळे, सायली संजीव, अमृता खानविलकर या चला हवा येऊद्या च्या मंचावर उपिस्थत होत्या. त्या वेळी माझा वट्टा या स्किट मध्ये मंचावर चंद्रा या अमृताच्या गाजलेल्या भूमिकेत एन्ट्री घेत कुशल ने चंद्राहा गाण्यावर डान्स केला आणि डान्स करता करता तो स्टेज वरून खाली पडला त्यालया खाली पडलेला बघून सर्व जण त्याला उचलायला धावले. सुदैवाने त्यात त्याला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. पण हि घटना त्या कार्यक्रमाचाच एक भाग होती कि खरच तो पडला या पेक्षा विनोद रंगवण्यासाठी कलाकाराला हि अशी जीवावर बेतू शकणारी मेहनत करावी लागते.(Kushal Badrike accident)
चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम प्रदीर्घ काळापासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आलेला आहे. जगभरात या कार्यक्रमाचे चाहते पाहायला मिळतात. यातील प्रत्येक कलाकारावर प्रेक्षक भरभरून प्रेम दर्शिवतात. अनेक वेगवेगळे विषय हे चला हवा येऊ द्या च्या मंचावरून मांडले जातात. खास करून या कार्यक्रमातील विनोद सोबतच पोस्टमन काका यांच्या मार्फत वाचली जाणारी पत्र हि प्रेक्षकांच्या जिव्हाळ्याचा विषय ठरत आहेत. भाऊ कदम, निलेश साबळे, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे हि मंडळी नेहमीच प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत आलेली आहेत.
====
हे देखील वाचा- ‘…मात्र त्यांनी मला नाकारले होते’, म्हणत पृथ्वीकने केला हास्यजत्रेबाबत खुलासा
=====