Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या नवीन पर्वातील स्पर्धकांची अंतिम सोहळ्यात जाण्यासाठीची चढाओढ दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या घरात टिकून राहण्यासाठी स्पर्धक एकमेकांना मागे टाकून स्वतः पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच ‘बिग बॉस’च्या घरात नॉमिनेशन टास्क पार पडला असून या टास्कमध्ये घरातील एकूण चार स्पर्धक नॉमिनेट झाले. घरात नॉमिनेट झालेल्या चार स्पर्धकांपैकी आर्या जाधव, वैभव चव्हाण, इरिना रुडाकोवा, अभिजीत सावंत हे आहेत. या चार स्पर्धकांवर टांगती तलवार असलेली पाहायला मिळत असताना आता नुकताच नॉमिनेशन प्रक्रियेचा भाग पार पडला.
यंदाच्या आठवड्यात घराबाहेर जाणाऱ्या स्पर्धकाचे नाव अखेर समोर आले आहे. हे नाव ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यंदाच्या या सीझन मधून इरिना रुडाकोवाचा प्रवास संपला आहे. इरिनाने अगदी पाहिल्या दिवसापासून प्रेक्षकांच्या मनात घर केलं होत. मराठी कळत असलं तरी नीट मराठी बोलता येत नव्हतं असं असलं तरी ती तिचा खेळ एकटी खेळत होती. फॉरेनर म्हणून ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश केल्यानंतर इरिनाने तिच्या प्रेमळ मराठी संवादाने प्रेक्षकांची मन जिंकली.
‘बिग बॉस’च्या घरात प्रत्येक स्पर्धकासह ती मराठी भाषा नव्याने शिकताना दिसली. अंकिताने तिला मालवणी तर डीपीने तिला कोल्हापुरी भाषा शिकवली. एकूणच हा प्रवास सुरु असताना इरिना वैभव चव्हाणच्या प्रेमात पडली. इरिना व वैभवची प्यारवाली लव्हस्टोरी ‘बिग बॉस’च्या घरात पाहणं रंजक ठरलं. घराबाहेर पडल्यानंतर इरिनाने तिच्याजवळचे साठवलेलं पैसे वैभवला दिले. इरिना घराबाहेर जाताच वैभव भावुक झालेला दिसला. तर अरबाजलाही अश्रू अनावर झाले.