कश्मिरा शाह हे मनोरंजन विश्वातील एक प्रसिद्ध नाव आहे जे तिच्या बोल्ड व्यक्तिमत्वासाठी प्रसिद्ध आहे. सध्या कश्मिरा पती कृष्णा अभिषेकबरोबर ‘लाफ्टर शेफ्स अनलिमिटेड एंटरटेनमेंट’ या कुकिंग रिॲलिटी शोमध्ये दिसत आहे. शोच्या नवीन एपिसोडमध्ये काही कलाकार त्यांच्याबरोबर सामील झाले आणि त्यांना स्वयंपाक करण्यात मदत केली. ‘बिग बॉस १६’ ची अर्चना गौतम कश्मिरा व कृष्णा अभिषेकला सपोर्ट करण्यासाठी आली होती. अर्चनाने शोमध्ये कृष्णाबरोबर फ्लर्ट केले ते तिला महागात पडलं. आणि आता कश्मिराने यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. (Krushna Abhishek Wife Angry)
कश्मिरा शाह ही टिनसेलटाउनमधील सर्वात स्पष्टवक्ते व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहे आणि ती आपले मत मांडण्यात मागेपुढे पाहत नाही. अलीकडेच ‘फिल्मीबीट’शी बोलताना कश्मिराने सांगितले की, ती तिच्या मुलांबद्दल आणि पतीबद्दल खूप सकारात्मक आहे. शोमध्ये अर्चनाने कृष्णाला मागून येऊन मिठी मारायला सांगितली याबाबत तिने भाष्य केलं. कश्मिरा म्हणाली, “‘लाफ्टर शेफ्स अनलिमिटेड एंटरटेनमेंटच्या एका एपिसोडमध्ये अर्चनाने गमतीने कृष्णाला मागून येऊन मिठी मारायला मला सांगितली, ज्यामुळे मी अस्वस्थ झाले. मी तिला नीट वागायला सांगितले नाहीतर मी तिच्या कानाखाली मारली असती. कोणतीही स्त्री माझ्या पतीला मला मागून धरायला सांगते हे मी सहन करणार नाही”.
शोमध्ये कश्मिराने अर्चनाला तिच्या पतीसह फ्लर्ट न करण्याची ताकीद दिली आणि मी त्याला मागून का मिठी मारेल असा प्रश्न केला. मात्र, अर्चना म्हणाली की, हा केवळ विनोद होता आणि गांभीर्याने घेऊ नये. दोघांनीही या प्रकरणाचा अधिक पाठपुरावा न करता चर्चा करणे बंद केले. याच वेळी कश्मिराने ‘बिग बॉस OTT 3’ च्या कानाखाली मारल्यानंतर वाढलेल्या प्रकरणावर तिचे विचार शेअर केले.
यात अरमान मलिक सर्वात मोठा असल्याचे ती म्हणाली. त्याने परिस्थिती हुशारीने हाताळायला हवी होती. विशाल अजूनही तरुण आहे आणि त्याने काही चुकीचे म्हटले तरी अरमानने त्याला इशारा करायला हवा होता आणि थेट हात उचलायला नको होता.