रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुप्रसिद्ध अभिनेत्रीला लेन्स लावणं पडलं महागात, डोळ्यांची अशी झाली अवस्था, म्हणाली, “मला दिसायचं बंद झालं आणि…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 21, 2024 | 3:03 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Jasmine Bhasin

सुप्रसिद्ध अभिनेत्रीला लेन्स लावणं पडलं महागात, डोळ्यांची अशी झाली अवस्था, म्हणाली, "मला दिसायचं बंद झालं आणि..."

अभिनेत्री जास्मिन भसीन सध्या कठीण काळातून जात असल्याचं समोर आलं. अभिनेत्रीला डोळ्यांचा त्रास झाला असल्याचा खुलासा तिने केला आहे. याबाबत बोलताना अभिनेत्रीने असं काही सांगितलं की, ज्यामुळे साऱ्या प्रेक्षकांमध्ये काळजीच वातावरण निर्माण झालं आहे. डोळ्यांच्या परिस्थितीबाबत सांगताना अभिनेत्रीने असा खुलासा केला की, “अलीकडे मी लेन्स लावून घेतले. आणि त्यानंतर माझे डोळे खराब झाले, दुखू लागले. डोळ्यांची जळजळ वाढली आणि काही वेळाने मला दिसणे बंद झाले”. (Jasmine Bhasin)

जास्मिनने सांगितले की, १७ जुलैला ती एका कार्यक्रमासाठी दिल्लीत होती. “यावेळी मी तयार होत असताना तिने लेन्स लावली. लेन्स लावल्याबरोबर डोळे जळजळू लागले. मला ताबडतोब डॉक्टरांकडे जायचे होते पण कामामुळे मी त्यावेळी जाऊ शकले नाही. आणि त्यावेळी मी आधी कार्यक्रमाला आणि नंतर डॉक्टरांकडे जायचं ठरवलं”. जस्मिन म्हणाली की, “मी संपूर्ण कार्यक्रमात सनग्लासेस घातले होते. माझी टीम मला कार्यक्रमात मदत करत होती कारण काही वेळानंतर मला काहीच दिसत नव्हते. माझ्या डोळ्यांची दृष्टी गेली”.

आणखी वाचा – ‘धर्मवीर २’च्या भव्य ट्रेलर लाँच सोहळ्याला बॉलिवूड कलाकारांची उपस्थिती, सलमान खानची ‘ती’ कृती लक्षवेधी, साधेपणाचं कौतुक

View this post on Instagram

A post shared by Jasmine Bhasin (@jasminbhasin2806)

या घटनेनंतर अभिनेत्रीला त्याच रात्री नेत्रतज्ज्ञांकडे जावे लागले. तिथे डॉक्टरांनी सांगितले की त्याच्या डोळ्यांचा कॉर्निया खराब झाला आहे. यानंतर अभिनेत्रीच्या डोळ्यांवर पट्टी लावण्यात आली. अभिनेत्री मुंबईत परतली असून तिच्यावर पुढील उपचार सुरु आहेत. जास्मिन तिच्या डोळ्यांवर उपचार घेत आहे. सध्याच्या परिस्थितीबद्दल तिने असे सांगितले की, “मला अजूनही खूप वेदना होत आहेत. डॉक्टरांनी सांगितले होते की मी चार ते पाच दिवसात बरी होईन पण तोपर्यंत मला माझ्या डोळ्यांची योग्य काळजी घ्यावी लागेल. हे माझ्यासाठी सोपे नाही कारण मी काहीही पाहू शकत नाही आहे. या दुखण्यामुळे मला रात्री झोपायला त्रास होत आहे”.

आणखी वाचा – कृष्णा अभिषेकसह जवळीक साधणं ‘या’ अभिनेत्रीला पडलं महागात, अभिनेत्याच्या बायकोनेच फटकारलं, म्हणाली, “कानाखाली देईन…”

जस्मिनला आशा आहे की ती लवकरच कामावर परतेल. ती असेही म्हणाली आहे की, “चांगली गोष्ट म्हणजे मला काम पुढे ढकलावे लागले नाही, मला आशा आहे की मी लवकरच बरी होऊन कामावर परतेन”.

Tags: bollywood gossipJasmine BhasinJasmine Bhasin healthJasmine Bhasin news
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Ambani and Taimur Nanny Salary

अनंत अंबानी व तैमूरच्या नॅनीचा पगार आहे तरी किती?, कॉर्पोरेट कंपनीच्या कर्मचाऱ्यालाही मागे टाकेल, ऐकून व्हाल थक्क

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.