सोमवार, सप्टेंबर 7, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

गोविंदाच्या भाचीचं ठरलं लग्न, भांडणं असूनही कृष्णा अभिषेक मामाला देणार पत्रिका, म्हणाला, “मतभेद असले तरीही…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 8, 2024 | 11:56 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Krushna Abhishek And Govinda

गोविंदाच्या भाचीचं ठरलं लग्न, भांडणं असूनही कृष्णा अभिषेक मामाला देणार पत्रिका, म्हणाला, "मतभेद असले तरीही…"

अभिनेता, कॉमेडियन कृष्णा अभिषेकने नुकत्याच एका कार्यक्रमात त्याची बहीण ‘बिग बॉस १३’ची स्पर्धक व टीव्ही अभिनेत्री आरती सिंह ही लवकरच तिचा बॉयफ्रेंड दीपक चौहानशी लग्न करणार असल्याचं सांगितलं. दोघे एक वर्षापासून डेट करत असून एप्रिल किंवा मेमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत. ‘ओएमजी’ या शोच्या १०व्या सीझनच्या लॉन्चिंगवेळी कृष्णाने या बातमीला दुजोरा दिला. (Krushna Abhishek And Govinda)

कृष्णा अभिषेकने त्याची बहीण आरती सिंहच्या लग्नाबाबतची मोठी बातमी शेअर केली. यावेळी त्याने खुलासा केला की, आरती तिचा प्रियकर दिपक चौहानसह लग्न करणार आहे. लग्नाच्या तपशीलाबद्दल विचारले असता, कृष्णाने सांगितले की, “लग्नबाबतचे सर्व अपडेट अधिकृतरित्या घोषित केले जातील”. आणि गंमतीने सांगितले की, त्याला आशा आहे की, आरती खर्चावर नियंत्रण ठेवेल.

आणखी वाचा – “पूर्वीपेक्षा अधिक…”, अखेर पतीबरोबर घटस्फोट घेण्याबाबत अंकिता लोखंडे स्पष्टच बोलली, म्हणाली, “आमचं नातं…”

View this post on Instagram

A post shared by Govinda (@govinda_herono1)

एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे कृष्णाने हेदेखील सांगितले की, “बॉलीवूड सुपरस्टार गोविंदा आणि सुनीता या त्यांच्या मामा मामींना लग्नाचे आमंत्रण पहिले देण्यात येईल. भूतकाळातील मतभेद असूनही, कृष्णाने आरतीच्या विशेष दिवसासाठी त्यांच्या कुटुंबातील एकतेवर विश्वास व्यक्त केला. तो म्हणाला, “सगळ्यात पहिलं निमंत्रण हे त्यांना देण्यात येईल. तो माझा मामा आहे, आमच्यात काही मतभेद झाले आहेत जो एक वेगळा मुद्दा आहे पण पहिली लग्नपत्रिका त्यांच्याकडे जाईल आणि तो निश्चितपणे लग्नाला उपस्थित राहणार आहे” असंही म्हणाला.

आणखी वाचा – वाडा, तिथेच मंदिर अन्…; स्वत:च्या मूळ गावी पोहोचला संकर्षण कऱ्हाडे, अंबेजोगाईचं दर्शनही घेतलं, म्हणाला, “घरच्या मारुतीच्या…”

आरती सिंह सध्या लग्न करण्यास सज्ज झाली आहे. यासाठी तिची लगीनघाई सुरु असून ती तिची मुंबईत लग्नसाठीची जागा शोधत आहे. येत्या एप्रिल किंवा मेमध्ये ती लग्न करण्याचा विचार करत आहे.

Tags: govinda krushna abhishek fightgovinda krushna relationshipkrushna abhishekkrushna abhishek and govindakrushna abhishek and govinda newskrushna abhishek on govinda
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Next Post
mrunmayee deshpande

Video : शेतात नवऱ्यासह कष्टाने भाज्या पिकवत आहे मृण्मयी देशपांडे, व्हिडीओ शेअर करत दाखवल्या फळभाज्या, चाहत्यांकडून कौतुक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.