रविवार, एप्रिल 26, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Priya Marathe Death : प्रिया मराठेच्या निधनाने हादरले मराठी कलाकार, शेवटचं पाहताना सगळेच ढसाढसा रडू लागले अन्…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 31, 2025 | 5:12 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Priya Marathe Last Rites

Priya Marathe Death : प्रिया मराठेच्या निधनाने हादरले मराठी कलाकार, शेवटचं पाहताना सगळेच ढसाढसा रडू लागले अन्…

Priya Marathe Last Rites : मराठी सिनेविश्वातून खळबळजनक बातमी समोर आली आहे. वयाच्या अवघ्या ३८व्या वर्षी प्रिया मराठेचे निधन झाले. अभिनेत्री बऱ्याच काळापासून कॅन्सरशी झुंज देत होती. तिच्या या लढाईत ती अयशस्वी ठरली. अभिनेत्रीला पती शंतनू मोघेने या काळात बरीच साथ दिली. पण तिची कॅन्सरशी सुरु असलेली झुंज अपयशी ठरली. ३१ ऑगस्ट रोजी वयाच्या ३८ व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला. कर्करोगाशी लढा अपयशी ठरली आणि रविवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास तिचे मीरारोड याठिकाणी निधन झाले.

आजारपणातही प्रिया मराठे काम करत होती. पण घेतलेल्या उपचाराने ती थकत असल्या कारणास्तव तिने मालिकांमध्ये अभिनय करणे सोडून दिले. ऑगस्ट २०२४ पर्यंत प्रिया तिच्या सोशल मीडियावर विशेष सक्रिय होती. ती शेवटचे ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेत अभिनेत्री शिवानी सोनार आणि अभिनेता सुबोध भावे यांच्यासह झळकली होती. प्रियाच्या निधनाने संपूर्ण कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे.

आणखी वाचा – Priya Marathe Death : मोठा धक्का! सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन, मराठी कलाविश्वावर शोककळा

अभिनेत्रीच्या अंतिम दर्शनाला अनेक कलाकार मंडळी तिच्या राहत्या घरी जमले. यावेळी सगळ्यांचे डोळे पाणावलेले पाहायला मिळाले. अभिनेता अभिजीत खांडकेकर, प्रार्थना बेहेरे, शर्मिला शिंदे, शाल्मली टोळ्ये, ओमप्रकाश शिंदे, दिग्दर्शक विजू माने आणि इतर कलाकार उपस्थित होते. यावेळी सगळेच एकमेकांना धीर देत ढसाढसा रडताना दिसले. अर्थात माध्यमांद्वारे समोर आलेल्या व्हिडीओमधील हे भावुक करणारे दृश्य होतेच शिवाय या व्हिडीओने मन हेलावून टाकले.

Tags: marathi actresspriya marathe deathPriya Marathe Last Rites
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

 air conditioner health risks
Lifestyle

AC Side Effects : उन्हाळ्यात AC चा अतिवापर आरोग्यासाठी घातक, थकवा, डोकेदुखी आणि…

एप्रिल 26, 2026 | 4:00 pm
 Arijit Singh Net Worth
Entertainment

आलिशान कार, अपार्टमेंट आणि…; बॉलिवूड गायकाकडे आहे करोडो रुपयांची मालकी, लाइव्ह कॉन्सर्टसाठी घेतो मोठी रक्कम

एप्रिल 26, 2026 | 11:00 am
Raj Sharma Passes Away
Entertainment

प्रसिद्ध कॉमेडियनचे वयाच्या ५०व्या वर्षी निधन, बऱ्याच दिवसांपासून होते रुग्णालयात, मृत्यूचे कारण अस्पष्ट

एप्रिल 25, 2026 | 1:12 pm
Biplab Dasgupta death
Entertainment

वयाच्या ७५व्या वर्षी सुप्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, रुग्णालयात नेतानाच वाटेत मृत्यू, सिनेसृष्टीवर शोककळा

एप्रिल 25, 2026 | 11:58 am
Next Post
Ankita Walawalkar Gauri Puja

पारंपरिक लूक, डोक्यावर सूप अन्…; अंकिता वालावलकरने सासरी भरला लग्नानंतरचा पहिला वौसा, सासूने दाखविली प्रथा, सूनेचं कौतुक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.