मंगळवार, एप्रिल 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

औषधांचा दुष्परिणाम, आजार वाढला अन्…; गोळ्यांनीच घेतला ‘दंगल’मधील छोट्या बबिता फोगटचा जीव, नेमकं काय घडलं?

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 17, 2024 | 6:00 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Know the real reason of Dangal fame Suhani Bhatnagar's death see the details

औषधांचा दुष्परिणाम, आजार वाढला अन्...; गोळ्यांनीच घेतला ‘दंगल’मधील छोट्या बबिता फोगटचा जीव, नेमकं काय घडलं?

हिंदी मनोरंजन सृष्टीतून नुकतीच एक दु:खद बातमी समोर आली आहे. ‘दंगल’ या लोकप्रिय चित्रपटात साकारलेल्या भूमिकेने तिने अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते. अभिनेत्री सुहानी भटनागर हिच्या अचानक झालेल्या निधनाने सिनेइंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. दंगल’मध्ये तिने आमिर खानच्या छोट्या मुलीची भूमिका साकारली होती. मात्र वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी तिने आपला जीव गमावावा लागलं आहे आणि ती घेत असलेल्या औषधांनी तिचा जीव घेतला असं म्हटलं जात आहे.

सुहानीच्या मृत्यूचं मुख्य कारण म्हणजे तिच्या शरीरात भरलेलं पाणी. काही महिन्यांपूर्वी तिचा मोठा अपघात झाला होता. त्यातून अभिनेत्री बचावली होती. मात्र तिच्या पायाला फ्रॅक्चर झाला होता आणि ते बरं करण्यासाठी सुहानीने ज्या गोळ्या घेतल्या होत्या त्या औषधांचा दुष्परिणाम झाला आणि तिच्या शरीरात हळू हळू पाणी भरू लागलं.

View this post on Instagram

A post shared by Suhani Bhatnagar (@bhatnagarsuhani)

औषधांच्या शरीरावरील दुष्परिणामामुळे सुहानीला आपला जीव गमवावा लागला आहे. ती अनेक दिवस दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार घेत होती. त्यामुळे डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करुनही तिला वाचवण्यात यश आले नाही. १७ फेब्रुवारी २०२४ रोजी सुहानीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

आणखी वाचा – अधिपतीला अक्षरापासून वेगळं करण्यासाठी भुवनेश्वरीची नवी खेळी, ‘तुला शिकवीन…’मध्ये नवं वळण, प्रोमो पाहून प्रेक्षक म्हणाले…

सुहानी भटनागरने २०१६मध्ये आमिर खानच्या ‘दंगल’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सुहानीला गाण्याची आणि नृत्याची खूप आवड होती. दंगल’मधील बापू सेहत के लीये तू हानिकारक है या गाण्यात तिचा अभिनय प्रेक्षकांणा आवडला होता. चित्रपटात तिच्याअ छोट्या भूमिकेनेही तिने प्रेक्षकांचे चांगलेच लक्ष वेधून घेतले होते.

आणखी वाचा – “खूप दुःख…”, ‘दंगल’मधील छोट्या बबिता फोगटच्या निधनानंतर आमिर खान हादरला, भावना अनावर, म्हणाला, “सुहानीसारखी तरुण मुलगी…”

दरम्यान, सुहानीच्या निधनाच्या वृत्तावर सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे. अगदी तरुण वयातच सुहानीने जगाचा निरोप घेतला असल्याने अनेकांकडून तिच्या निधनावर हळहळ व्यक्त केली जात आहे. सुहानीवर आज म्हणजेच शनिवारी फरीदाबादमधील अजरौंडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Tags: bollywood actorbollywood actressbollywood newsDangal Fame ActressSuhani BhatnagarSuhani Bhatnagar DeathSuhani Bhatnagar Death Newsदंगल फेम अभिनेत्रीबॉलिवूड अभिनेताबॉलिवूड अभिनेत्रीसुहानी भटनागरसुहानी भटनागर मृत्यूसुहानी भटनागर मृत्यू बातमी
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Famous Actress and Actor Wedding News
Entertainment

“सुपारी फुटली, लग्न ठरलं” सुप्रसिद्ध अभिनेत्री-अभिनेता अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

एप्रिल 21, 2026 | 4:28 pm
dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Next Post
Hema Malini on Esha deol

घटस्फोटानंतर ईशा करणार राजकारणात प्रवेश?, हेमा मालिनी म्हणाल्या, "आमचा तिला पाठिंबा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.