ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र व अभिनेत्री हेमा मालिनी यांची लाडकी लेक ईशा देओल सध्या तिच्या कौटुंबिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. भरत तख्तानी व अभिनेत्री ईशा देओल या दोघांनीही संगनमताने वेगळे झाले असल्याचे जाहीर केले होते. दरम्याने ईशाची आई हेमा यांनी घटस्फोटाला पाठिंबा दिला असून वडील धर्मेंद्र यांनी मात्र नाराजी दर्शवली आहे. आईवडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत ईशाने चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले होते. मात्र तिला अपेक्षित असे यश मिळाले नाही. त्यानंतर २०१२ मध्ये ईशाने भरतसह लग्नगाठ बांधली. दरम्यान, अंतर्गत मतभेदांमुळे दोघेही विभक्त झाले. घटस्फोटानंतर आता ईशा राजकारणात प्रवेश करणार अशा चर्चा रंगलेल्या असतानाच खुद्द हेमा मालिनी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. (Hema Malini on Esha deol)
२२ जानेवारीला आयोध्येमध्ये भव्यदिव्य राममंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. यानंतर आता हेमा मालिनी यांनी राममंदिरात रागसेवेच्या कार्यक्रमासाठी हजेरी लावली होती. अभिनेत्री असण्याबरोबरचं हेमा मालिनी राजकारणामध्येदेखील सक्रिय आहेत. सध्या हेमा मालिनी या लोकसभेमध्ये मथुराचे प्रतिनिधित्व करत आहेत. ‘एबीपी न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान, हेमा मालिनी यांनी खुलासा केला की, “पती धर्मेंद्र यांनी आतापर्यंत पूर्ण पाठिंबा दिला आहे. माझे कुटुंब कायम माझ्याबरोबर आहे,” असे या ज्येष्ठ अभिनेत्रीने सांगितले. त्या पुढे म्हणाल्या की, “धर्मेंद्रजींमुळेच मी य़शस्वी होऊ शकले. ते माझ्या मुंबईतील घराची काळजी घेत आहेत, त्यामुळे मी मथुरेत अगदी निश्चिंत आहे. मी येऊन जाऊन असते. मी जे करत आहे त्यामुळे धर्मेंद्रजी नेहमी खुश असतात. त्यांचा नेहमीच मला खूप पाठिंबा मिळतो. धर्मेंद्रजींना कधी वेळ मिळाला तर ते मथुरेतही येतात”, असंही त्या म्हणाल्या.
ईशालाही राजकारणाची आवड असल्याने आईच्या पाऊलावर पाऊल ठेवत ईशा राजकारणात प्रवेश करणार असल्याचं सर्वत्र बोललं जात आहे. ईशाच्या राजकारणाबद्दल भाष्य करताना, “ईशाला जर राजकारणात रस असेल तर तिने नक्की प्रवेश करावा, राजकारणात रस असल्याने येणाऱ्या काही वर्षांमध्ये ईशा राजकारणात प्रवेश करु शकते.” असे हेमा मालिनी यांनी स्पष्ट केले. तसेच “ईशाला राजकारणात प्रवेश करायचा असेल तर आमचा तिला पूर्ण पाठिंबा असेल.” असेदेखील स्पष्ट केले आहे.
ईशाच्या घटस्फोटाच्या काही दिवसानंतरच हेमा मालिनी यांचे वक्तव्य चर्चेत आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. १२ वर्षाच्या संसाराला ईशाने पूर्णविराम दिल्यानंतर तिच्या राजकारणातील प्रवेशाबद्दल सर्वत्र चर्चा होत आहे.