मराठी सिनेविश्वात असे काही कलाकार आहेत ज्यांनी एक काळ इतका गाजवलाय की त्यांचं नाव जरी घेतलं तरी त्यांच्या कारकिर्दीचा फ्लॅशबॅक डोळ्यासमोर उभा राहतो. आपल्या उत्तम अभिनयशैलीने या कलाकार मंडळींनी त्यांच्या चाहत्यांना बांधून ठेवलं. हाडाच्या कलावंतांपैकी दोन नाव आजही आपण आवर्जून घेतो ती नाव म्हणजे दिग्गज सिनेअभिनेते निळू फुले आणि दादा कोंडके. आज जरी ही दोन जबरदस्त व्यक्तिमत्व आपल्यात नसली तरी त्यांच्या जागा प्रत्येक महाराष्ट्रीयाच्या मनात आहेत असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. सर्वसामान्यांमधून आलेल्या दोन्ही कलाकारांनी मराठी सिनेविश्वात इतिहास रचला. (Dada Kondke And Nilu Phule)
‘बाई वाड्यावर या…’ हे वाक्य प्रत्येकाला माहित आहे. हा संवाद कोणत्या चित्रपटातील हे कोणाला विचारलं तर कदाचित माहिती नसेल मात्र हा संवाद कोणा व्यक्तीचा आहे असं विचारलं तर प्रत्येक जण उत्तर द्यायला हात उंचावेल. घरात कोणताही वारसा नसताना केवळ काळेपोटीच्या आवडीने त्यांनी सिनेविश्वात काम केले. कथा अकलेच्या कांद्याची या नाट्यामुळे निळू भाऊ कलाकार म्हणून प्रकाशझोतात आले.
पाहा काय आहे निळू भाऊ आणि दादा कोंडके यांचा किस्सा (Dada Kondke And Nilu Phule)
तर सिनेविश्वात एका नटाचीच काही काळ चलती होती तो नट म्हणजे दादा कोंडके. अघळपघळ कपडे घालणारा हा भाबडा नायक दादांनी जनतेला दिला. दादांचं हे रूप लोकांना कमालीचं भावलं. आणि आपल्या विनोदी शैलीने त्यांनी चाहत्यांच्या संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात घर केलं. दादांच्या प्रत्येक चित्रपटाला त्यांचा हक्काचा माणूस होता, एवढी ओळख त्यांनी निर्माण केली होती.(Dada Kondke And Nilu Phule)
निळू फुले यांच्या एका निकटवर्तीयाने निळू फुले आणि दादा कोंडके यांच्याबद्दल खूप छान लिहिलंय आणि ते म्हणजे, भाऊंच्या बाबतीत महत्वाचा संदर्भ द्यायचा झाल्यास हे सांगता येईल की, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जेथे दूरदर्शन पोहोचले नाही, तेथे दोन माणसे पोहोचली, ती म्हणजे दादा कोंडके आणि निळूभाऊ. दादा आणि निळूभाऊंचे ट्युनिंग तर सर्व परिचितच आहे. या दोघांनी पन्नास वर्षात जे काम केले ते महाराष्ट्र कधीही विसरणार नाही.(Dada Kondke And Nilu Phule)
‘सोंगाड्या’ या चित्रपटात निळू भाऊ आणि दादा कोंडके यांची चांगलीच गट्टी जमली होती. चित्रपटाव्यतिरिक्त निळू भाऊ आणि दादा कोंडके यांचे चांगले संबंध होते.