शुक्रवार, मे 16, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : स्वस्तात मस्त डिझाइनर ब्लाऊज फक्त ५०० रुपयांपासून दादरमध्ये कुठे मिळणार?, नववधूसाठी तर कमी पैशांमध्ये डिझाइनर लूक

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 7, 2024 | 1:13 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Latest Designer Blouse Collection

सेलिब्रिटी स्टाइल डिझाइनर ब्लाऊज फक्त ५०० रुपयांपासून मिळणार, दादरमधील 'या' ठिकाणी स्वस्तात मस्त Shopping

लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा निर्णय आणि दिवस. या खास दिवसासाठी प्रत्येक जोडपं कसं सुंदर आणि उठून दिसता येईल या प्रयत्नांमध्ये असतं. अलिकडे तर कपडे, दागिने लग्नांमध्ये विशेष आकर्षण ठरत आहेत. यामागचं कारण म्हणजे विविध पेहरावामध्ये विविध डिझाइन आणि सेलिब्रिटी स्टाइल कपडे. सध्या लगीनसराईचं वातावरण आहे. कित्येक नववधूंना सेलिब्रिटी मंडळींचा त्यांच्या लग्नातील लूक फॉलो करावा अशी इच्छा असते. अशाच नववधूंससाठी खास ब्लाऊज डिझाइन आम्ही घेऊन आलो आहोत. अगदी कमी किंमतीमध्ये उपलब्ध असणारे हे ब्लाऊज कुठे खरेदी करता येतील चला जाणून घेऊया. (Latest Designer Blouse Collection)

सुंदर विविध रंगाचे स्लिव्हलेस, प्लेन ब्लाऊज येथे हव्या त्या साईजमध्ये उपलब्ध असून याची किंमत ५०० रुपयांपासून सुरु होते. वारली पेंटिंगमध्ये उपलब्ध असलेले स्लिव्हलेस ब्लाऊज ६०० रुपयांत उपलब्ध आहेत.

आणखी वाचा – बायकोला पुरस्कार मिळताच प्रसाद जवादेचा आनंद गगनात मावेना, व्हिडीओही केला शेअर, म्हणाला, “बायको…”

पैठणी, बाहुबली ब्लाऊज सध्या विशेष चर्चेत आहेत. यांत बरेच रंग उपलब्ध असून याची किंमत केवळ फक्त ८५० रुपये इतकी आहे.

ब्रॉकेटचे ब्लाऊज विविध रंगांमध्ये या दुकानात उपलब्ध असून, विविध डिझाईनमध्ये उपलब्ध आहेत. याची किंमत ९०० ते १००० रुपयांदरम्यान आहे.

तसेच वेस्टर्न आऊटफिटसाठी म्हणा वा पेस्टल साडी वा ऑर्गेंझा साडीसाठी तसेच लेहेंगा व दुपट्टा मॅच करुन घालण्यासाठीही हे वेस्टर्न स्टाईल ब्लाऊज फारच सुंदर आहेत. याची किंमत ९५० रुपये आहे.

सध्या लगीनघाई सुरु असून लग्नासाठी जर तुम्ही ब्लाऊज करत असाल तर नववधूसाठी इथे उत्तम दर्जाचे व उत्तम डिझाइनचे ब्लाऊज उपलब्ध आहेत. हातावर मोराची नक्षीदार डिझाइन असलेले हे वेगळ्या स्टाईलचे ब्लाऊज आहेत. v नेक आणि त्यावर वर्क असलेले हे नववधूसाठी असलेल्या खास किंमत फक्त १०५० रुपये इतकी आहे.

तसेच कोणत्याही साडीवर वेलवेट ब्लाऊज हा जातो. त्यामुळे साडीवर बरेचजण वेलवेटचे ब्लाऊज घालणं पसंत करतात. नववधुसाठी हे खास वेलवेट एम्ब्रॉडरी असलेले ब्लाऊज १२५० रुपयांत उपलब्ध आहेत.

आणखी वाचा – ‘आई कुठे…’मध्ये अरुंधतीच्या दुसऱ्या नवऱ्याचे निधन दाखवताच भडकले प्रेक्षक, मालिका बंद करण्याची मागणी, म्हणाले, “तिचा तिसरा नवरा आणा…”

सध्या ट्रेंड असलेल्या कॉटन साडींवर घालण्यासाठी त्यांच्याकडे लखनवी ब्लाऊज उपलब्ध आहेत. यांची किंमत ८५० रुपये आहे.

तर बॉलिवूड स्टाइल साड्यांवर घातल्या जाणाऱ्या डायमंड, व मोत्यांच्या मण्यांनी डिझाईन केलेले ब्लाऊज हे देखील या दुकानात उपलब्ध आहेत. याची किंमत २००० ते ४००० रुपायंदरम्यान आहेत.

हे डिझाइनर व हटके ब्लाऊज अगदी आपल्या बजेटमध्ये दादर येथील नक्षत्र मॉलमध्ये मिळतात. ‘मिधा’ असं या दुकानाचं नाव असून दादर पश्चिम येथे असलेल्या या दुकानात अगदी योग्य दरात ब्लाऊज मिळतील.

Tags: blouse collectiondesigner blouselatest blouse collectionLatest Designer Blouse Collection
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Water Disadvantages
Lifestyle

तुम्हीही जास्त पाणी पीत आहात का?, फायद्यापेक्षा तोटेच अधिक, नक्की काय होतं?

मे 16, 2025 | 7:00 pm
aamir khan gf gauri airport video
Entertainment

Video : ६०व्या वर्षी आमिर खान प्रेमात, दोन घटस्फोटानंतर रिलेशनशिप, तिच्या खांद्यावर डोकं ठेवत…

मे 16, 2025 | 6:16 pm
Siddhivinayak temple news
Social

हातावरचं पोट, घर भाडं, कमाईच नाही आणि…; सिद्धीविनायक मंदिरात हार, नारळ बंद करताच विक्रेत्यांचे हाल, गरीब परिस्थितीत…

मे 16, 2025 | 4:50 pm
KRK On Muslims
Entertainment

“भारतातील मुस्लिम खूप आनंदी आणि…”, बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं वक्तव्य, म्हणाला, “रस्त्यावर मरत…”

मे 16, 2025 | 3:44 pm
Next Post
Bollywood Celebrities at Anant Ambani Wedding

Video : अंबानींची पार्टी काही संपेना; पुन्हा जामनगरला पोहोचले बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध कलाकार, नक्की चाललंय तरी काय?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.