गुरूवार, मे 15, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : अंबानींची पार्टी काही संपेना; पुन्हा जामनगरला पोहोचले बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध कलाकार, नक्की चाललंय तरी काय?

सौरभ जाधवby सौरभ जाधव
मार्च 7, 2024 | 1:32 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bollywood Celebrities at Anant Ambani Wedding

Bollywood Celebrities at Anant Ambani Wedding

सध्या सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे अनंत-राधिकाच्या प्री वेडिंगची. बॉलीवूड, हॉलिवूड कलाकारांच्या आणि जगप्रसिद्ध खेळाडू, उद्योगपती यांच्या उपस्थितीने जाम नगर येथे हा सोहळा चांगलाच रंगला. या सोहळ्यातील कलाकारांचे लूक्स आणि परफॉर्मन्सनी चाहत्यांची मनं जिंकली. या कार्यक्रमातील सर्वात जास्त चर्चेत राहिलेली घटना म्हणजे बॉलीवूडमधील तीन खान यांनी एकत्र सादर केलेला डान्स परफॉर्मन्स.(Bollywood Celebrities at Anant Ambani Wedding)

पहिल्यांदाच शाह रुख खान, सलमान खान आणि आमिर खान यांनी एकत्र एकाच मंचावर येत डान्स केला. तिघांनीही आपल्या गाजलेल्या हुकस्टेपवर डान्स करत या सोहळ्यात रंगत आणली. १ मार्च ते ३ मार्च हा कार्यक्रम जामनगर येथे हा सोहळा पार पडला. या कार्यक्रमात कलाकारांच्या डान्ससह अनेक गायकांच्या सुंदर गाण्यांनी या सोहळ्याला चार चांद लावले.(salman khan shahrukh khan aamir khan)

View this post on Instagram

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

आणखी वाचा- शाहरुख, सलमान व आमिर खान लग्नामध्ये जाण्यासाठी किती पैसे घेतात?, अंबानी कुटुंबियांकडून घेतले तब्बल इतके रुपये

जामनगर येथे पार पडलेल्या या सोहळ्यानंतर सगळी मंडळी घरी परतली परंतु हा सोहळा अजून संपलेला नाही याची माहिती आता समोर आली आहे. शाह रुख खान, आमिर खान, सलमान खान पुन्हा एकदा एकाच मंचावर झळकणार असल्याचं आता समजतंय. शाह रुख, सलमान, आमिर यांच्यासह अभिनेत्री जान्हवी कपूर यांच्यासह अन्य कलाकार देखील पुन्हा जामनगर येथे जमल्याचं पाहायला मिळतंय. प्री वेडिंग सोहळ्यानंतर अंबानी कुटुंबाकडून रिलायन्स कंपनीतील कर्मचाऱ्यांसाठी एक म्युझिकल शो अरेंज करण्यात आला. त्यासाठी हे सर्व कलाकार पुन्हा एकदा जाम नगर येथे जमले आहेत.(Bollywood Celebrities at Anant Ambani Wedding)

आणखी वाचा- नातेवाईकांच्या लग्नात नाचताना धर्मेंद्र यांना दुखापत, पायालाही मार, तिथे नेमकं काय घडलं?

शाह रुख, सलमान, आमिर यांच्या डान्स परफॉर्मन्सचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. शाहरुख, सलमान व आमिर या तिघांनी पहिल्यांदाच एकत्र परफॉर्म करत इतिहासच रचला आहे, असं म्हणणं चुकीचं राहणार नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनंत अंबानी व राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनमध्ये परफॉर्म करण्यासाठी या तिघांनी अंबानी कुटुंबाकडून एक रुपयाही घेतला नाही. शाहरुख, सलमान व आमिर खान यांनी एकत्र अंबानी कुटुंबाबरोबरच्या नातेसंबंधांसाठी मोफत परफॉर्म केले आहे. तर अमेरिकन पॉप सिंगर रिहानाने तिच्या परफॉर्मन्ससाठी ५४ कोटी रुपये फी घेतली.

Tags: amir khanAnant Ambani and Radhika MerchantBollywood Celebrities at Anant Ambani Weddingentertainmententertainment newssalman khan
सौरभ जाधव

सौरभ जाधव

सौरभ जाधव, पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव. पत्रकारिकेचे शिक्षण गुरु नानक खालसा कॉलेज मधून पूर्ण केले असून पत्रकारिता क्षेत्रात पदव्युत्तर पदवी जोशी बेडेकर या कॉलेजमधून संपादन केली आहे. सुरुवातीला जनादेश वृत्तवाहिनी येथे काही काळ काम करून त्या नंतर कलाकृती मीडिया या डिजिटल पोर्टलला लेखक, सोशल मीडिया तसेच कॅमेरा विभागात देखील कामाचा अनुभव आहे. सध्या 'इट्स मज्जा' या पोर्टलमध्ये रिपोर्टर या पदावर कार्यरत आहे. कोणत्याही आवश्यक माहितीसाठी इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

navri mile hitlerla serial off air
Entertainment

झी मराठी वाहिनीवरील सुप्रसिद्ध मालिका वर्षभरानंतर बंद होणार, कलाकार भावुक, म्हणाले, “इथली माणसं…”

मे 15, 2025 | 5:16 pm
kalki koechlin water birth
Entertainment

कल्की कोचलिनने पाण्यात मुलाला दिला जन्म, चुडैल म्हणून लोकांनी हिणवलं अन्…; ‘वॉटर बर्थ’ नक्की काय?

मे 15, 2025 | 3:43 pm
Tinnu Anand On Trolling
Entertainment

रस्त्यावरच्या कुत्र्यांना हॉकी स्टिकने मारण्याच्या विधानावरुन टिनू आनंद यांचं स्पष्टीकरण, म्हणाले, “कुत्र्यांनी माझ्यावर हल्ला केला तर…”

मे 15, 2025 | 3:33 pm
Garbage Collector Passed 10th Exam
Women

पतीपासून विभक्त, लेकाचा एकटीने सांभाळ अन् …; पुण्यातील कचरा वेचणारी ‘ती’ झाली दहावी पास, प्रेरणादायी संघर्ष

मे 15, 2025 | 2:00 pm
Next Post
Gal gadot Welcomes Her 4th baby

३८व्या वर्षी चौथ्यांदा आई झाली सुप्रसिद्ध अभिनेत्री, चिमुकलीचं घरी जंगी स्वागत, नावही ठेवलं फारच खास

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.