‘शक्तिमान’ हि मालिका न बघणारा क्वचितच एखादा असेल. २७ वर्ष होऊन गेली तरीही या मालिकेला आजवर कोणीही विसरू शकले नाही. मालिका संपली पण सोशल मीडियाच्या माध्यमातून शक्तिमानचे अनेक मिम, संवाद व्हायरल होत असतात. ‘गंगाधर हि शक्तिमान है’ हे वाक्य आजही आपल्या कानी पडते आणि आपण आजही हसतो. या मालिकेने प्रेक्षकांचे खूप मनोरंज केले. या मालिकेतील सर्व पात्रदेखील आज सगळ्यांच्या लक्षात आहेत. यामध्ये गीता बिस्वास पासून काली बिल्ली पर्यंतच्या सर्व भूमिका आजही प्रेक्षकांच्या मानवर कोरल्या गेल्या आहेत. पण आता ही स्टार कास्ट आता नक्की काय करते हे जाणून घेऊया. (shaktimaan star cast)
या मालिकेतील मुख्य भूमिका शक्तिमानची होती. हि भूमिका मुकेश खन्ना यांनी साकारली होती. त्यांच्या अभिनयाचे आजही कौतुक केले जाते. आज मुकेश राजकारणात अधिक सक्रिय असलेले पाहायला मिळतात.

शक्तिमान नंतर या मालिकेतील महत्त्वाचे पात्र म्हणजे किलविश. तमराज किलविश ची भूमिका अभिनेते सुरेंद्र पाल यांनी केली होती. त्यांची हि भूमिका नाकारात्मकी होती. पण या भूमिकेला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले आहे. सुरेंद्र पाल आज अनेक मालिका व चित्रपटांमध्ये दिसून येतात.
शक्तिमान या मालिकेमध्ये गीता बिस्वास ही भूमिका साकारणारी वैष्णवी महंत यांनी मुख्य भूमिका साकारली होती. त्यांनी एका पत्रकाराची भूमिका केली होती. त्यांचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. त्यावेळी त्यांचे खूप सारे चाहते होते. त्या आजही मालिकाविश्वामध्ये सक्रिय आहेत.
तसेच या मालिकेमध्ये काली बिल्ली हे पात्र देखील खूप लोकप्रिय झाले होते. हे पात्र लोकप्रिय अभिनेत्री अश्विनी काळसेकरने साकारले होते. यामध्ये ती खानायिकेच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाली होती. अश्विनी सध्या बॉलिवूडमध्ये खूप सक्रिय असून विविध भूमिकांमध्ये पाहायला मिळते.
त्यातील अजून एक महत्त्वाचे पात्र म्हणजे ‘सायंटिस्ट का जैकाल’. हि भूमिका अभिनेते ललित परमाणु यांनी केली होती. यांचीदेखील या मालिकेमध्ये नकारात्मक भूमिका होती. लोक त्यांच्या भूमिकेचा खूप तिरस्कार करत असत. पण त्यांचा अभिनय मात्र खूप कमालीचा होता. तसेच किशोर भानुशाली हे देखील या मालिकेचा एक भाग होते. त्यांनी या मालिकेमध्ये ‘नवरंगी चोराची भूमिका केली होती. हे पात्र लोकांच्या खूपच आवडीचे होते.
त्याचप्रमाणे अभिनेत्री कौशल्या गिडवाणी या देखील ‘शक्तिमान’ मालिकेचा भाग होत्या. सर्वात आधी गीता बिस्वासची भूमिका कौशल्याला मिळाली होती. मात्र काही कारणांनी कौशल्या या मालिकेतून बाहेर पडली. सध्या कौशल्या बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये काम करताना दिसते.