नुकताच गुजरात येथे अंबानी कुटुंबाचा लाडका व धाकटा मुलगा अनंत अंबानी व विरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंट यांचा लग्नाआधीचा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात पार पडला. या सोहळ्यासाठी जगभरातून अनेक दिग्गजांनी उपस्थिती दर्शवली होती. या तीन दिवस आयोजित केलेल्या सोहळ्यामध्ये नीता अंबानी यांच्या पेहरावाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळी त्यांचा एक वेगळा अंदाज पाहायला मिळाला. नीता अंबानी यांच्या लूकसमोर सर्व अभिनेत्री फिक्या पडलेल्या दिसून आल्या. नीता अंबानी या व्यवसायमध्येही तितक्याच निपुण आहेत. पण नीता अंबानी यांच्या विहीणीही त्यांना सौंदर्य व व्यावसायामध्ये टक्कर देताना दिसत आहेत. (Nita ambani relatives )
उद्योगपती मुकेश अंबानी व नीता अंबानी यांना एक मुलगी व दोन मुलं आहेत. ईशा व आकाश यांचे लग्न थाटामाटात पार पडले असून अनंतचे लग्न येत्या जुलैमध्ये होणार आहे. अंबानी कुटुंबाच्या तीनही विहीणी व्यवसाय क्षेत्रातील दिग्गज आहेत. सर्वात आधी जाणून घेऊया ईशा अंबानीच्या सासूबद्दल. ईशाने आनंद पिरामलबरोबर लग्न केलं. ईशाच्या सासू स्वाती मिरामल या खूप स्टायलिश आहेतच पण त्याचबरोबर त्या खूप तंदुरुस्त आहेत. जगातील यशस्वी माहिलांमध्ये आठ वेळा त्यांचे नाव आले आहे. तसेच त्यांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. त्या ‘कौन्सिल ऑफ ट्रेड फॉर पीएम आणि सायंटिफिक ॲडव्हायजरी कौन्सिल’च्याही सदस्य होत्या. याव्यतिरिक्त त्या मुंबईमधील ‘गोपाळकृष्ण पिरमाल मेमोरियल हॉस्पिटल’च्या एमडीही आहेत.
त्यानंतर आकाश अंबानीच्या सासू म्हणजे श्लोका मेहताच्या आई मोना मेहता याही खूप स्टायलिश व फॅशनेबल आहेत. याबरोबरच त्या एक यशस्वी उद्योजिकाही आहेत. मोना या ज्वेलरी डिझायनर आहेत. श्लोकाचे वडीलही हिऱ्याचे व्यापारी आहेत. मोना या ‘रोजी ब्लु’या कंपनीच्या सह-संस्थापिका आहेत. त्यांचे परदेशात अनेक स्टोअर्स आहेत.
आता अंबानीचा धाकटा मुलगा अनंतच्या सासूबाईंबद्दल जाणून घेऊया. राधिका मर्चंटची आई शैला मर्चंट या या खूप तंदुरुस्त असून त्यांचे लेकीच्या लग्नाआधीच्या सोहळ्यातील अनेक सुंदर फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. याबरोबरच त्या ‘एनकोर हेल्थकेअर’च्या मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. तसेच त्या ‘अथर्व इम्पेक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी’च्या डायरेक्टरही आहेत. शैला या पती विरेन मर्चंट यांचा व्यवसायही सांभाळत आहेत.