मंगळवार, जून 9, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

खास रांगोळी, स्पेशल लूक, दागिने अन्…; डोहाळे जेवणासाठी कार्तिकी गायकवाडचा राजेशाही थाट, कुटुंबियांचाही आनंद गगनात मावेना

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 29, 2024 | 1:40 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Kartiki Gaikwad Goodnews

खास रांगोळी, स्पेशल लूक, दागिने अन्…; डोहाळे जेवणासाठी कार्तिकी गायकवाडचा राजेशाही थाट, कुटुंबियांचाही आनंद गगनात मावेना

‘सारेगमप लिटल चॅम्प्स’ या लोकप्रिय रिऍलिटी शोमधून घराघरांत पोहोचलेली गायिका म्हणजे कार्तिकी गायकवाड. कार्तिकीने आजवर तिच्या गायनशैलीने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. याशिवाय कार्तिकीने विविध कार्यक्रम व चित्रपटांमध्ये गायलेल्या गाण्यांनी संगीतप्रेमींचं मनोरंजन केलं. ती जितकी तिच्या कामामुळे चर्चेत राहते, तितकीच ती तिच्या खासगी आयुष्यामुळे कायमच चर्चेत असते. अशातच कार्तिकीने नुकत्याच दिलेल्या गोड बातमीने साऱ्यांच्या नजरा वळवल्या आहेत. कार्तिकी लवकरच आई होणार आहे. कार्तिकीचा डोहाळ जेवणातील एक सुंदर असा व्हिडीओ समोर आला आहे. (Kartiki Gaikwad Goodnews)

लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर आता कार्तिकीने गुडन्यूज दिली आहे. कार्तिकी लवकरच आई होणार आहे. कार्तिकीच्या डोहाळ जेवणातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यांत कार्तिकी व रोनित यांचा खास लूक लक्ष वेधून घेत आहे. कार्तिकीच्या डोहाळ जेवणातही राजेशाही थाटमाट साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. उपस्थित नातेवाईक, कुटुंबीय यांच्या समवेत हा डोहाळ जेवणाचा कार्यक्रम पार पडला आहे. या सोहळ्यासाठी खास नक्षीदार रांगोळीही काढलेली पाहायला मिळाली.

आणखी वाचा – Video : लग्नाच्या चार वर्षांनंतर कार्तिकी गायकवाड आई होणार, थाटामाटात पार पडला डोहाळे जेवणाचा कार्यक्रम, नवऱ्यासह धमाकेदार एन्ट्री अन्…; व्हिडीओ व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Arti Bhosale (@shri_sanskruti_manglagaur)

कार्तिकीच्या डोहाळ जेवणात ती व तिचा नवरा पारंपरिक अंदाजात दिसले. कार्तिकीने या खास दिवसासाठी हिरव्या रंगाची जरीची सुंदर साडी नेसली होती तर रोनित शेरवानीमध्ये दिसला. कार्तिकीने या खास सोहळ्यासाठी खास पारंपरिक दागिने घातले होते. अगदी हातात हात घालून कार्तिकी व रोनितने एंट्री घेतली. रोनित यावेळी कार्तिकीची काळजी घेतानाही दिसला. तर कार्तिकीचे आई-बाबा, भाऊही यावेळी या सोहळ्याला तिच्याबरोबर उपस्थित होते. अगदी शाही थाटामाटात कार्तिकीचा हा डोहाळ जेवणाचा कार्यक्रम पार पडलेला दिसला.

आणखी वाचा – जगण्याची आशाही सोडली, मृत्यू जवळून पाहिला अन्…; कॅन्सरनंतर स्टेजवर पहिल्यांदाच आल्यावर अतुल परचुरेंना रडू कोसळलं, कलाकारांचेही डोळे पाणावले

कार्तिकीने डिसेंबर २०२० साली व्यावसायिक रोनित पिसेशी लग्नगाठ बांधत सगळ्यांना सुखद धक्का दिला. कार्तिकी व रोनित यांचा शाही लग्नसोहळा पार पडला होता. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. कार्तिकी गायकवाडचा नवरा रोनित पिसे हा पेशाने व्यावसायिक आहे. तो पुण्याचा राहणारा असून इंजिनीअर आहे. विशेष म्हणजे रोनितलाही संगीताची आवड आहे.

Tags: entertainmentkartiki gaikwadKartiki Gaikwad and ronit piseKartiki Gaikwad Pregnant
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
Saregamapa Little Champs fame Kartiki Gaikwad Husband Ronit Pise Know about

कार्तिकी गायकवाडचा नवरा आहे मोठा उद्योजक, तो नेमकं काय काम करतो?, रोनितला करण्यात आलं होतं सन्मानित कारण…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.