मंगळवार, एप्रिल 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

ना कोणताही स्टार तरी ‘मुंज्या’ला पाहायला तुफान गर्दी, चित्रपटगृहात रेकॉर्डब्रेक कमाई करणार, दोन दिवसातच कमावले तब्बल…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 9, 2024 | 3:30 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Munjya Movie

ना कोणताही स्टार तरी 'मुंज्या'ला पाहायला तुफान गर्दी, चित्रपटगृहात रेकॉर्डब्रेक कमाई करणार, दोन दिवसातच कमावले तब्बल…

सध्या सर्वत्र ‘मुंज्या’ या रहस्यमय कॉमेडी चित्रपटाची चर्चा सुरु असलेली पाहायला मिळत आहे. अल्पावधीतच या चित्रपटाने चमत्कार केला आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने बक्कळ कमाई केलेली पाहायला मिळत आहे. चित्रपटात कोणताही मोठा स्टार किंवा प्रसिद्ध चेहरा नसतानाही चित्रपटाने बक्कळ कमाई केली. पहिल्याच दिवशी अपेक्षेपेक्षा दुप्पट कमाई करत चित्रपटाने दुसऱ्या दिवशीही प्रेक्षकांना आश्चर्यचकित केले. दुसरीकडे, राजकुमार राव व जान्हवी कपूर यांचा ‘मिस्टर अँड मिसेस माही’ हा चित्रपटदेखील चांगली कमाई करत आहे. (Munjya Movie)

सध्या या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण ‘मुंज्या’ आता ‘मिस्टर अँड मिसेस माही’ला टक्कर देताना दिसत आहे. ७ जून रोजी प्रदर्शित झालेल्या हॉरर कॉमेडी ‘मुंज्या’ चित्रपटाने ३.७५ कोटींची ओपनिंग केली होती. या चित्रपटाची प्रसिद्धी प्रेक्षकांनीच केली आणि याचा खूप फायदा झाला. त्यामुळे चित्रपटाच्या कथेचे कौतुकही होत आहे. त्यामुळेच ‘मुंज्या’ प्रेक्षकांना थिएटरकडे आकर्षित करण्यात यशस्वी होत आहे.

आणखी वाचा – ‘झी’ मराठीच्या ‘या’ नव्या शोमध्ये संकर्षण कऱ्हाडे व अमृता खानविलकरच्या हाती परिक्षणाची धुरा, तर श्रेया बुगडेचीही महत्त्वपूर्ण भूमिका

या चित्रपटात कोणताही मोठा स्टार नाही, तरीही या चित्रपटाची कमाई दुसऱ्याच दिवशी प्रचंड दुप्पट झाली. Sacnilk च्या रिपोर्टनुसार, ‘मुंज्या’ ने दुसऱ्या दिवशी म्हणजे ८ जून रोजी जवळपास ६.७५ कोटी रुपयांचा व्यवसाय केला. अशा प्रकारे दोन दिवसांचे एकूण कलेक्शन १०.७५ कोटी रुपये झाले आहे. दुस-या दिवशी, ‘मुंज्या’ने सकाळच्या शोमध्ये १३.७९% इतकी जागा भरली होती. जी दुपारच्या शोमध्ये २८.८१% पर्यंत वाढली आणि नंतर रात्रीच्या शोमध्ये ४६.५३% पर्यंत पोहोचली.

आणखी वाचा – “ऑनस्क्रीन मिठी मारताना पाहिलं आणि मी उठून गेलो”, संग्राम साळवीने बायको खुशबू तावडेचा सांगितला मालिकेदरम्यानचा एक किस्सा, म्हणाला…

‘मुंज्या’चे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केले आहे. तर ‘स्त्री’ आणि ‘भेडिया’ सारखे हिट चित्रपट देणारे दिनेश विजन आणि अमर कौशिक यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. मोना सिंग, शर्वरी वाघ आणि अभय सिंग या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाचे बजेट ३० कोटी रुपये आहे.

Tags: bollywood movieentertainmentMunjya Moviemunjya movie box office collectionmunjya movie record
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Next Post
siddharth jadhav award

अभिमानास्पद! सिद्धार्थ जाधवला 'या' लोकप्रिय पुरस्काराने केलं सन्मानित, पोस्ट शेअर करत म्हणाला, "तुम्ही मेहनत घेता त्यावर…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.