शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : “दारु-सिगारेटला कधीच हात लावला नाही”, अरबाज पटेलचा खुलासा, म्हणाला, “आता मला २५वं वर्ष सुरु आहे आणि…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 27, 2024 | 11:57 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 arbaaz patel age

अरबाज पटेलच वय नेमकं किती, खुलासा करत दिली माहिती

Bigg Boss Marathi 5 :  ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ ची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. कारण या सीझनने यापूर्वीचे सर्व टीआरपी रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. अशातच गेल्या आठवड्यात अरबाज पटेलची घरातून एक्झिट झाली होती. मात्र ‘बिग बॉस मराठी’ पाचच्या सीझनच्या सुरुवातीपासूनच अरबाज पटेल हा ट्रॉफीचा दावेदार म्हणून ओळखला जात होता. घराचा कॅप्टन असतानाही अरबाजला घराबाहेर पडावं लागलं त्यामुळे त्याच जाणं हे अनपेक्षित होतं. अरबाजच्या एलिमिनेशननंतर घरातील स्पर्धकांनाही खूप मोठा धक्का बसला. निक्कीबरोबरची त्याची मैत्री होती अरबाजच्या जाण्यानंतर ती ढसाढसा रडताना दिसली.

‘बिग बॉस मराठी’मध्ये आठव्या आठवड्याच्या शेवटी धक्कादायक एलिमिनेशन पार पडले. नवव्या आठवड्यासाठी ज्याची कॅप्टन म्हणून निवड झाली होती, तो अरबाज पटेल बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडला. BB मराठीच्या घरातून बाहेर पडल्यानंतर अरबाज सोशल मीडियावर विशेष सक्रिय झाला आहे. अरबाज सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असतो. त्याचे अनेक डान्स व्हिडीओ तो पोस्ट करताना दिसतो. ‘बिग बॉस’च्या घरात असताना अरबाजच्या वैयक्तिक आयुष्याची घराबाहेर चर्चा रंगलेली पाहायला मिळाली.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : दोन महिन्यांनी लेकाला पाहून डीपीच्या वडिलांनाही रडू आवरेना, घट्ट मिठी मारत ढसाढसा रडले, ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष

View this post on Instagram

A post shared by Arbaz Shaikh (@mr.arbazpatel)

सध्या अरबाज घराबाहेर असून तो माध्यमांना मुलाखती देताना दिसतोय. यावेळी नुकतीच त्याने फिल्मीमंत्रा या युट्युब चॅनेलला मुलाखत दिली आहे. यावेळी बोलताना अरबाजने अनेक खुलासे केले. या मुलाखतीत बोलताना अरबाज म्हणाला, “मला आता २५ वं वर्ष सुरु आहे”. म्हणजे अरबाज हा वयाने लहान आहे. २४ वर्ष त्याला पूर्ण झाले असून त्याला आता २५ वं वर्ष सुरु आहे. वयाने मोठा वाटणारा हा अरबाज मात्र वयाने लहान आहे हे आश्चर्यचकित करणार आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi 5 : “त्याच्या साखरपुडा झाला आहे आणि…” आईने निक्कीला सांगितले अरबाजचे सत्य, ऐकून बसला धक्का, म्हणाली. “आता सगळं संपलं अन्…”

इतकंच नव्हे तर अरबाजला तो व्यसनी आहे का?, असं विचारलं यावर उत्तर देत तो म्हणाला, “मी दारु-सिगारेटला कधीच हात लावला नाही आहे. मी चहासुद्धा कधीच पीत नाही. मला चांगले कपडे घालण्याचा आणि चांगलं दिसण्याचा खूप शॉक आहे. कारण आपण चांगले दिसणं खूप महत्त्वाचं आहे. इतकंच नव्हे तर मला चांगलं चमचमीत खाद्यपदार्थ खाण्याची आवड आहे. आता तर मी बनवायलाही शिकलो आहे”.

Tags: Arbaaz Patelarbaaz patel agebigg boss marathi 5
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
bigg boss marathi new promo

“आधी ऐकलं नाही आता…” अरबाजचा साखरपुडा झाल्याचं निक्कीच्या आईने सांगताच प्रेक्षक भडकले, म्हणाले, “नाटकं कशाला?”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.